Marathi News Live Update : देशभर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत देशभरातील मोठ्या नेत्यांसह विविध पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील इतर राजकीय आणि सामाजिक बातम्यांच्या आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Marathi News Live Today, 23 April 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

19:41 (IST) 23 Apr 2024
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाला धक्का ; दक्षिणमध्ये लोकनियुक्त सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर</strong>: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे दुपारच्या सुमारास नेर्ली गावामध्ये आगमन झाले . यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात पुजारी यांनी सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पुजारी यांनी सांगितले. लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे . महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे . अनेकजण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळेल असं चित्र आहे. गावामध्ये केंद्र सरकारचा आलेला निधी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकार सतेज पाटील यांनी केला हे आपल्याला पटलं नाही असे मत पुजारी यांनी व्यक्त केले. माजी आमदार अमल महाडिक यांच्या विचारांनी प्रभावित होवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पुजारी म्हणाले.

19:01 (IST) 23 Apr 2024
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा

या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

सविस्तर वाचा…

18:50 (IST) 23 Apr 2024
“…तर रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार”, सतेज पाटील यांचा इशारा

कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनी माझ्या आड येण्याचे धाडस करू नये, असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला.

सविस्तर वाचा…

18:45 (IST) 23 Apr 2024
सांगली: मविआतील बंडखोरीनंतर गुरुवारी काँग्रेसची बैठक

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसताना लोकसभा निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

सविस्तर वाचा…

18:39 (IST) 23 Apr 2024
दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम भाजप खासदारांनी केले – विशाल पाटील

गेल्या दहा वर्षात केवळ दुसर्‍याने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम खासदार संजयकाका पाटील यांनी केले, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

सविस्तर वाचा…

17:46 (IST) 23 Apr 2024
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. नवीन औद्योगिक वसाहती स्थापन करणे, आयटी पार्क उभारणीसह सर्वंकष धोरण बनवून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे दिली.

सविस्तर वाचा…

17:16 (IST) 23 Apr 2024
गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

वाचा सविस्तर…

17:05 (IST) 23 Apr 2024
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण

कल्याण – कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे.

सविस्तर वाचा…

16:48 (IST) 23 Apr 2024
मनसेच्या मतांच्या जोरावर महायुती उमेदवार पालघरमधून विजयी होणार- अविनाश जाधव

पालघर : महायुतीचा पालघरमधील उमेदवार निश्चित झाला नसल्याने मनसेने अजूनही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पालघरमध्ये उडी घेतली नाही. या निवडणुकीत मनसे महायुती उमेदवाराच्या प्रचारात पूर्ण जोमाने उतरणार असून मनसेच्या जिल्ह्यातील दीड लाख मतांच्या मदतीने महायुतीचा उमेदवार निवडून येणार असा विश्वास मनसेचे पालघर लोकसभा प्रभारी अविनाश जाधव यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

16:22 (IST) 23 Apr 2024
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’

नागपूर : कळत न कळत चुका किंवा गुन्हा घडल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करीत असते. या विभागाने कैद्यांना कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्याची मुभा दिली आहे. या उपक्रमात गेल्या तीन महिन्यांत नागपूर कारागृहातील साडेचार हजार कैद्यांनी लाभ घेतला.

वाचा सविस्तर…

16:22 (IST) 23 Apr 2024
नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?

नागपूर : मागील तीन निवडणुकांमध्ये आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या काही लाखांनी वाढायची. यावेळी मात्र २०१९ च्या तुलनेत मतदारसंख्या केवळ २० हजाराने वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत.

वाचा सविस्तर…

15:57 (IST) 23 Apr 2024
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम

वसई: टॅंकर चालकांचा बेदरकारपणा व निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात वीस दिवसांत वसई विरारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर घालण्यासाठी पुन्हा एकदा विरार वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पहिल्याच दिवशी ८ टॅंकरवर कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा –

15:42 (IST) 23 Apr 2024
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला शासनाने मंजुरी दिल्याने प्रशासनाने १ एप्रिलपासून जुनेच पाणी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

15:39 (IST) 23 Apr 2024
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काही तासांवर येवून ठेपली आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांकडे असलेले निवडणूक चिन्हसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळी निवडणूक चिन्हामुळे महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर…

15:37 (IST) 23 Apr 2024
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण व गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

15:25 (IST) 23 Apr 2024
भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार – रोहित पवार; अजित पवार यांना लगावला टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही प्रचार करून भाऊ पार्थ पवार याचा बदला घेणार आहे. अजित पवार हे पार्थ पवार याचा झालेला पराभव विसरले असतील आम्ही अद्यापही त्याचा पराभव विसरलो नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही. पुढे ते म्हणाले, ज्या व्यक्तीने मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या गोष्टी विसरून ज्या उमेदवाराने पराभव केला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार येत असतील तर यावरूनच अजित पवारांची परिस्थिती कळून येत आहे. अजित पवार हे या सर्व गोष्टी विसरले असतील. मला पार्थला सांगायचं आहे. या गोष्टी मी विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला. त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुझा भाऊ इथं आलेला आहे.

15:20 (IST) 23 Apr 2024
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही

वसई – सौर उर्जेचा वापर करणार्‍या नागरिकांना मालमत्ता करात सवलत आणि अनुदान देण्याची पालिकेची घोषणा केवळ कागदोपत्रीच ठरली आहे. ही योजना सुरू करून ६ वर्षे उलटली तरी अद्याप एकालाही या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात आलेले नाही.

सविस्तर वाचा…

14:47 (IST) 23 Apr 2024
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम

वसई- ‘लोकशाही टिकवा, मतदान करा’ असा संदेश देत आता वासुदेव वसई विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी वसई विरार महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.

सविस्तर वाचा….

14:43 (IST) 23 Apr 2024
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात

पारसकर यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे एकूण पाच हजार रुपये आणून द्यावेत, असे संबंधित तक्रारदार यांना सुचविले.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 23 Apr 2024
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत

अचूक निदान, वैयक्तिक उपचार पद्धती आणि औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा सामना करण्यासाठी डॉक्टरांकडून संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण उपचाराचा वापर हा अभ्यास अधोरेखित करतो.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 23 Apr 2024
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचे धागेदोरे सुरतपर्यंत, तापी नदीत सापडली बंदूक अन्…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली दुसरी बंदूक गुजरातच्या सुरत शहरात सापडली आहे. तापी नदीत फेकलेली बंदूक मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढली. यासह पोलिसांनी तीन मॅगझिन्सदेखील सापडले आहेत.

13:42 (IST) 23 Apr 2024
उष्माघात नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पहाणी

पनवेल : पनवेल महापालिकेच्या खारघर आणि तळोजा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील नूकत्याच कार्यान्वित केलेल्या उष्माघात नियंत्रण कक्षाला (शितगृह) सोमवारी पालिका आय़ुक्तांनी भेट देऊन बाह्य रुग्णसेवेतील रुग्णांची चौकशी केली. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पालिकेच्या प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रात शितगृह कक्ष पालिकेने सुरु केले आहे.

पनवेल पालिकेच्या २३ आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये शितगृह तातडीने उभारण्यात आले आहे. पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी सोमवारी शितगृह कक्षासोबत आरोग्य वर्धिनी केंद्रातील विविध सेवासुविधांची आढावा घेतला.

13:15 (IST) 23 Apr 2024
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 23 Apr 2024
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 23 Apr 2024
नाशिकमध्ये ‘वंचित’तर्फे करण गायकर उमेदवार

सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 23 Apr 2024
पुणे : मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग

पुणे : मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 23 Apr 2024
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक

नागपूर : वर्धा मार्गावरील डबलडेकर उड्डाण पुलावरून मनीषनगरकडे जाण्यासाठी बांधलेल्या मनीषनगर उड्डाण पुलाच्या ‘लँडिंग’वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लँडिंग’च्या अगदी तोंडावरच चौक (महाजन आटा चक्की चौक) असल्याने पुलावरून सुसाट येणाऱ्या वाहनांमुळे चोवीस तास अपघाताची भीती कायम आहे. या चौकात आतापर्यंत बरेच अपघात घडले आहेत.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 23 Apr 2024
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा

उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 23 Apr 2024
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!

गडचिरोली : मागील पाच ते सात वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही शहर अवैध सट्टेबाजार चालवणाऱ्यांच्या विळख्यात सापडली असून या माध्यमातून दरवर्षी ‘आयपीएल’वर कोट्यवधीची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

12:00 (IST) 23 Apr 2024
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

शेतात सापडलेल्या गुप्तधनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला आसाममधून अटक करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले.

सविस्तर वाचा…

आमदार राजू पाटील (फोटो-संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणूक ही वाघाची डीएनए टेस्ट : मनसे आमदार राजू पाटील

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारासाठी मनसेही प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.

“ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल. मी याबाबत जास्त काही बोलत नाही. राजकारण करा, परंतु नेरिटीव्ह सेट करू नका. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार हे पाहत आहोत. एवढ्या राजकीय घटना घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही”, असे आमदार राजू पाटील म्हणाले.