Maharashtra News Today, 15 June 2022: राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष सहभागी होत आहे. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत हजर राहणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून देसाई मुंबईहून नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.
तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळी नऊ वाजता त्यांनी मुंबईतून लखनऊसाठी उड्डाण केलं आहे. इस्कॉन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते अयोध्यासाठी रवाना होणार आहेत. अयोध्येत राम मदिरांचं दर्शन घेतल्यानंतर ते हनुमानगढीला देखील जाणार आहेत. तर सायंकाळी शरयू नदीकाठी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.
Maharashtra Latest News Today: अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
“तीर्थक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान कसा होतो?”, असा सवाल करीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेतेसदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. “पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांच्या मालकीची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी.”, असा खोचक सल्ला देखील खोत यांनी दिला. वाचा सविस्तर बातमी…
पुण्यातील लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात एका व्यापाऱ्यावर गोळीबार करुन पसार झालेल्या एकास गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
सध्या निम्म्या महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल झाला असला, तरी पुढील पाच ते सहा दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १८ जूनपासून मात्र दक्षिण कोकणात पाऊस काही प्रमाणात जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा प्रवास गेल्या दोन दिवसांपासून थांबला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तो विदर्भाच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक आहे.” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
पुणे विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून आस्थेने विचारपूस केल्याने राष्ट्रवादीच्या एका गटात पोटदुखी सुरू झाली. त्यामुळे ते आंदोलन करीत आहे, अशी टीका भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची चौकशी केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनायसमोर हजर झाले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींची चौकशी सुरु असून प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी ईडीला ‘यंग इंडियन’कडून आपण एकही पैसा घेता नसल्याची सांगितलं.
प्रेम करताना सुखी संसाराची अनेक स्वप्न रंगवणाऱ्या प्रेमीयुगुलांची प्रेमविवाहानंतर अगदी सहा महिन्यांतच मने दुभंगत आहेत. गेल्या पाच वर्षांत २ हजार ८६२ दाम्पत्यांनी प्रेमविवाहानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.८० टक्के प्रेमविवाहास कुटुंबीय तयार होत नाहीत.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. शिवाय आता शाळा, महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा काहीसे चिंताजनक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार २४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१९,४४२ झाली आहे. वाचा सविस्त बातमी…
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विचारणा केली. मात्र शरद पवारांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. शरद पवारांनी आपल्याला अजून सक्रीय राजकारणात राहायचं असल्याचं सांगितलं आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील खंबाळपाडा रस्त्यावरील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी कंपनीतून दीड लाखाचे सामान चोरून नेले आहे.
तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभरातील शाळा बुधवारी सुरू झाल्या. मात्र अंबरनाथ शहरातील सर्वात पहिली हिंदी भाषिक शाळेची घंटा पहिल्या दिवशी वाजलीच नाही. अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसर असलेल्या या शाळेची घंटा, वर्गातील पंखे, पाण्याची मोटार, पाण्याचे मीटर, दिवे असा तब्बल आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी सुट्टीच्या काळात लंपास केला.
राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाडीचा एका टांग्याला धक्का लागल्याने टांगा मालकाने त्याच्या मुलांसह एसटी चालकाला काठीने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुलचंद जैस्वार आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फुलचंदला अटक केली आहे.
जमीन मोजणी केल्यानंतर हद्द कायम ठेवण्यासाठी एकाकडून वीस हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.या प्रकरणी राजाराम दत्तात्रय शिंदे (वय ५४) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भात मोसमी पावसाची घोषणा भारतीय हवामान खात्याने पुढे ढकलली असली तरीही उपराजधानीत बुधवारी दुपार पासूनच पावसाला सुरुवात झाली. विदर्भातील इतर जिल्ह्यातही पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मी चे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून, या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज (बुधवार) केली. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे जनता दरबार उपक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाचा सविस्तर बातमी…
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद नगण्य आहे. जे काही करायचे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात करुन दाखवू असे म्हणत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना आव्हान दिले आहे. त्यांचे हेच आव्हान धनंजय महाडिक यांनी स्वीकारले असून आम्ही रणांगण सोडलेले नाही. आणखी ताकतीने येणार आहोत, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आडनावांवरुन कोण ओबीसी आहे आणि कोण नाही हे ठरवलं जातंय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर असे होत असेल तर ते चुकीचे आहे, असे मत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या दाव्याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वाचा सविस्तर
महापालिका क्षेत्रात बुधवारी दोन ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने मॉकड्रील केली. पावसाचे पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याठिकाणी मदत तसेच बचावकार्य करण्यासाठी सर्वच यंत्रणा सक्षम आहेत की नाहीत, याची चाचपणी यावेळी करण्यात आली.
कोंढवा भागात मध्यरात्री दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पिसोळी भागातील एका इलेक्ट्रिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरी करण्यात आली होती. अभिजीत गांगुर्डेने चोरी केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर गांगुर्डेला अटक करण्यात आली.
बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा दोरीने गळा आवून खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून केल्यानंतर तरुणाचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला. तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात बाल कामगारांची शोध मोहीम सुरु आहे. या अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंब्रा येथील छोट्या कारखान्यांमध्ये आणि उल्हासनगर येथील कपड्याच्या दुकानात धाड टाकून एकूण सात बालकामगारांची सुटका केली आहे. यात तीन मुली आणि चार मुलांचा समावेश असून ही सर्व मुले ही १५ ते १८ वयोगटातील आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. सुनील छेत्रीने मंगळवारी १४ जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला. या सामन्यात सुनील छेत्रीने ८४ वा गोल केला. यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. सुनील छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकलं आहे.
सुनील छेत्रीची जबरदस्त कामगिरी! ठरला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू; मेस्सीपेक्षा फक्त दोन गोल मागे https://t.co/fViLVQ71yD #SunilChhetri #AFCAsianCup2023Qualifiers #IndianFootball @IndianFootball
— LoksattaLive (@LoksattaLive) June 15, 2022
शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलुप तोडून रोकड तसेच दागिने असा ऐवज लांबविला.दत्तवाडी भागातील लक्ष्मीनगर सोसायटीतील रहिवासी महादेव वसंत भोसले (वय ४२) यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडले.
सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली.या घटनेत गजानन राठोड (वय २९, रा. धायरी) जखमी झाला असून त्याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकीसाठी बोलावले जात आहे. आजदेखील त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. याच कारणामुळे राजधानी दिल्लीसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते तथा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत. या निदर्शनांचं लोण पुण्यापर्यंत पोहोचलं आहे. वाचा सविस्तर
जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांकडून चालविल्या जाणाऱ्या लघु उद्योगांची भूमिका महत्वाची असते. करोना काळात या महिला बचत गटांचे आर्थिक गणित कोलमडून पडले होते. ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उदरनिर्वाहाचे साधन हे बचत गटांमार्फत चालविले जाणारे विविध लघु उद्योग आहेत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सकाळी मुंबईतून आयोध्यासाठी रवाना झाले आहेत.