Maharashtra News Today, 15 June 2022: राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष सहभागी होत आहे. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत हजर राहणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून देसाई मुंबईहून नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.
तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळी नऊ वाजता त्यांनी मुंबईतून लखनऊसाठी उड्डाण केलं आहे. इस्कॉन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते अयोध्यासाठी रवाना होणार आहेत. अयोध्येत राम मदिरांचं दर्शन घेतल्यानंतर ते हनुमानगढीला देखील जाणार आहेत. तर सायंकाळी शरयू नदीकाठी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.
Maharashtra Latest News Today: अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांमध्ये म्हणजेच, जानेवारी ते जून या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात १९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना ठाणे पोलिसांनी हातोहात पकडले आहे. मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ११ जणांना पोलिसांनी अटक केली होती.
एका मोटार कार चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून पुढून-मागून कोणी येत आहे का, याची पाहणी न करता अचानक जोराने दरवाजा उघडला. त्याचवेळी मोटारीच्या पाठीमागून सायकल वरून येत असलेल्या विद्यार्थिनीला दरवाजाचा जोरदार फटका बसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जवळपास २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना विशेष मोहीम राबवून परत भारतात आणण्यात आले आहे. मात्र याच विद्यार्थ्यांपुढे आता पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत सरकार या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करत आहे, असा सवाल त्यांनी केलाय. वाचा सविस्तर

उल्हासनगरच्या मध्यवर्ती भागात बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी भर पडते आहे. त्यामुळे अशा काही भागात सम विषम पद्धतीने वाहने उभी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशी बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. सविस्तर बातमी
‘मेट्रो-३’च्या कारशेडच्या वादग्रस्त जागेसह परिसरातील ६,३७५ एकर जागेची मालकी मिळाल्याच्या खासगी कंपनीच्या दाव्याचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाची दिशाभूल करून खासगी कंपनीने जमिनीची मालकी मिळवल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये या जागेबाबत सुरू असलेल्या वादात पडणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कांजूर येथील ६ हजार एकर जागेवर आदर्श वॉटर पार्क अँड रिसॉर्ट या खासगी कंपनीने दावा केला होता. राज्य सरकारने केलेल्या याचिकेत कंपनीला प्रतिवादीही करण्यात आले होते.
'मेट्रो ३' कारशेड जमीन वाद: राज्य आणि केंद्र सरकारमधील वादात पडणार नाही; दिलासा देताना हायकोर्टाने केलं स्पष्ट https://t.co/uAr8detkxy #Metro #BombayHighCourt
— LoksattaLive (@LoksattaLive) June 15, 2022
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘मोदी महागाई बाजार’ आयोजित करून अनोख्या पद्धतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले.महागाईची झळ बसलेलल्या विविध छोट्या व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून विविध पदार्थ, भाजी आदिची या आंदोलनात विक्री केली. तसेच वाढत्या महागाईमुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या.
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका तरूणीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी सात महाविद्यालयीन तरूण, एक तरूणी अशा आठ जणांविरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तरूणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
मित्रांकडून गैरफायदा; लैंगिक अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; कल्याणमध्ये तरूणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्याhttps://t.co/D9pfsKhrrS

सोसायटीच्या आवारात मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी बाहेर आले असताना तरुणीने आत्महत्या केल्याचं समजलं#Thane #CrimeNews
शहरात वाहनतळ नसल्याने निर्माण होणा-या समस्या सोडवण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तीन बहुतरीय वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. १५ कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शहरात वर्दळीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
डोंबिवली पूर्वे रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या पाटकर रस्त्यावरून विटांनी भरलेला एक अवजड ट्रक जात असताना अचानक बुधवारी सकाळी त्या भागातील रस्ता खचला. विटांसह ट्रकचा मागील भाग टायरसह जमिनीत रूतला. ही घटना घडताच या भागात काही वेळ वाहतूक कोंडी झाली. येथे वाचा सविस्तर वृत्त
विटांच्या ट्रकमुळे डोंंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता खचला; परिसरात बघ्यांची गर्दी अन् वाहतूक कोंडीhttps://t.co/ylfrsdImC3

अवजड वाहनांना या भागात प्रवेश बंदी आहे, असं रिक्षाचालकांनी असं चालकाला सांगितलं होतं.#dombivli #Thane
दिल्ली कारागृह विभागाअंतर्गत येणाऱ्या काही तुरुंगात अलीकडेच कैद्यांकडे ड्रग्स आणि अवैध सीम कार्ड आढळले होते. असा प्रकार रोखण्यासाठी आता कारागृहांमध्ये अतिरिक्त सुरक्षा म्हणून श्वान पथक तैनात केलं जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं मंगळवारी दिली. सविस्तर बातमी
गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपशेल पराभवाचा सामना करावा लागला. तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची सलग तीन दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. अशा विविध प्रश्नांवर बोलताना संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर बातमी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सव मंडपात गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे.
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाब कोर्टाने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूसेवाला यांच्या हत्येचा कट रचणारा बिष्णोई मुख्य आरोपी असून त्याला कडक सुरक्षाव्यवस्थेत मानसा येथून मोहालीला हलवण्यात येत आहे. बिष्णोईला बुलेटप्रूफ गाडीतून नेलं जात असून जवळपास दोन डझन गाड्यांमधून १०० पोलिसांचा ताफा त्याची सुरक्षा करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णोईला पुढील काही काळासाठी अज्ञात ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरकसपणे भूमिका मांडणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन इथून पुढे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सर्व पक्षीयांचा अनुभव घेऊन आता संभाजीराजे छत्रपती यांनी स्वबळ अजमावण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केली आहे. या पार्श्वभूमवीर त्यांनी केलेल्या ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेच्या स्थापनेवरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याच संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर…
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे विरोधक आता कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता विरोधक पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्याती शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी ५ जी स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे. यासोबतच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स पेमेंट) भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला २० हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल. जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सकाळी मुंबईतून आयोध्यासाठी रवाना झाले आहेत.