Mumbai Maharashtra News Live Today : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी आपल्या बहुसंख्या जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. आज महायुतीच्या जागा वाटपांचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती काल (दि. २७ मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही जागांवरून धुसफुस सुरू आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू नाराज आहेत. तर सांगलीमध्ये शिवसेनेने चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस नाराज आहे. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून दिवसभरात घडणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी जाणून घेऊ या.

Live Updates

Maharashtra News Live Updates 28 March 2024

18:59 (IST) 28 Mar 2024
अजित पवार गटाला धक्का! 'या' ठिकाणी घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघ भाजपाने अजित पवार गटाला सोडला आहे. याठिकाणी शरद पवार यांचे निकटवर्तीय मोहम्मद फैजल यांनी सलग दोन निवडणुकीत विजय मिळविला आहे. हा मतदारसंघ अजित पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी युसूफ टी.पी. यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना घड्याळ चिन्हाऐवजी स्कूटर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. महाराष्ट्रा आणि नागालँडमध्ये मात्र घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे.

18:19 (IST) 28 Mar 2024
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान ३१ मार्चला ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 28 Mar 2024
सीबीआयकडून प्रफुल पटेल यांना क्लिन चीट, भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा

सीबीआयने २०१७ सालच्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा दिला आहे. नागरी उड्डाण मंत्री असताना एअर इंडियाला विमान देण्याच्या निर्णयात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात आता आता प्रफुल पटेल यांना दिलासा मिळाला असून सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करून हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

17:21 (IST) 28 Mar 2024
बावनकुळेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं – काँग्रेसचा आरोप

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ही बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माननीय सर्वोच्च न्यायालयात या बाबतीत निकाल दिला अशी खोटी माहिती सांगून सर्वोच्च न्यायालयाची आणि आचारसंहीता या दोन्ही नियमांचे उल्लंघन केलं आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

16:02 (IST) 28 Mar 2024
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

‘दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला इतके कष्ट दिले नाहीत’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 28 Mar 2024
अभिनेते गोविंदा, काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश होणार

थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात विविध व्यक्तिंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे. अभिनेते गोविंदा यांच्यासह सिनेसृष्टीतील काही कलाकार शिवसेनेत प्रवेश करणार असून काँग्रेसचे नेते संजय निरुपमही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. संजय निरुपम यांच्याकडून मात्र यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

15:51 (IST) 28 Mar 2024
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 28 Mar 2024
जळगाव, रावेर जागेसाठी मविआचा काथ्याकूट सुरुच, ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत

जळगाव : जळगावमध्ये भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना महायुतीकडून भाजपने उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीकडून कोणाला निवडणूक आखाड्यात उतरवायचे, यावर अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. ठाकरे गटाकडून भाजपने उमेदवारी नाकारलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव चर्चेत आले असून, रावेरसाठी शरदचंद्र पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची नावे घेतली जात आहेत.

वाचा सविस्तर...

15:40 (IST) 28 Mar 2024
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे दुसऱ्यांदा उधळून लावले गेले.

वाचा सविस्तर...

15:37 (IST) 28 Mar 2024
“बारामतीची जागा महायुती जिंकणारच!”, आमदार गोपीचंद पडळकरांना विश्वास

लोकसभा निवडणुकीला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असून राज्यात अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 28 Mar 2024
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

उरण : फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर या निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धुळवडीनिमित्ताने जंगलात जाऊन तेथील वन्यजीव आणि प्राण्यांसाठी मृत झालेले पाणीसाठे पुन्हा जिवंत केले आहेत.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 28 Mar 2024
फळे विक्री उपकर बुडवणाऱ्यांवर कारवाई, एपीएमसी प्रशासनाचा निर्णय; प्रामुख्याने आंब्याच्या जातीचा उल्लेख करणे अनिवार्य

नवी मुंबई : कमी दराने फळ विक्री दाखवून उपकर बुडवणाऱ्यांवर आता एपीएमसी प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे. खासकरून सध्या आंबे विक्रीत ही अफरातफर केली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यावर प्रशासनाने आंबा विक्रीबाबत आंब्याची जात कोठून आणली इत्यादीबाबत स्पष्ट उल्लेख अनिवार्य केला आहे.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 28 Mar 2024
६३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विकासकांकडूनही खरेदी!

मुंबई : देशातील २५ विकासकांनी एकूण ६३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. यामध्ये मुंबईतील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या कल्पतरु, रुस्तमजी, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, के. रहेजा, ओमकार, बीकेसी प्रॉपर्टीज आदी विकासकांची नावे या यादीत आहेत. मुंबईत बांधकाम क्षेत्रात जम बसवू पाहणाऱ्या डीएलएफचाही त्यात समावेश आहे.

सविस्तर वाचा...

15:21 (IST) 28 Mar 2024
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड झाले थंड… ‘वर्षा’वर काय घडले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

14:57 (IST) 28 Mar 2024
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने

पाम बीच मार्गावरील सायन-पनवेल महामार्गाखालील वाशीजवळील उड्डाणपुलाखालील कामाला नुकतीच सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

14:33 (IST) 28 Mar 2024
महायुतीत उभी फूट? आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज……

बुलढाणा मतदार संघातील नाट्यमय राजकीय घडामोडीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे शिंदे गटासह युतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर...

14:25 (IST) 28 Mar 2024
मुंबईच्या मालाडमध्ये २४ तासांत भीषण आगीच्या दोन घटना

मुंबईमधील मालाडच्या दिंडोशी परिसरात एका गारमेंट दुकानाला आग लागली असून अग्निशामक दलाचे आठ बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मागच्या २४ तासांत मालाडमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना घडली आहे. काल रात्री मालाड पश्चिमेस बॉम्बे टॉकीज कंपाऊंड परिसरात एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली होती. याठिकाणाहून ५० लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढले गेले.

https://twitter.com/ANI/status/1773266080384917961

14:21 (IST) 28 Mar 2024
राजधानी एक्स्प्रेसला अतिरिक्त डबा जोडणार

मुंबई : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांची कायम गर्दी असते. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई - नागपूर दुरांतो एक्स्प्रेसलाही कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२२२१ सीएसएमटी- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला सीएसएमटी येथे १ एप्रिलपासून आणि गाडी क्रमांक २२२२२ हजरत निजामुद्दीन - राजधानी एक्स्प्रेसला हजरत निजामुद्दीन येथे २ एप्रिलपासून वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १२२८९ नागपूर- सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसला नागपूर येथे १ एप्रिलपासून आणि गाडी क्रमांक १२२९० सीएसएमटी - नागपूर दुरांतो एक्सप्रेसला सीएसएमटी येथे २ एप्रिलपासून वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे. सध्या ३१ मार्चपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडला आहे.

14:03 (IST) 28 Mar 2024
या चिमण्यांनो परत फिरा…! शेकडो गावातील गावकरी घालताहेत साद

चिमणी संवर्धनाच्या मोहिमेत गावकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने केला आहे.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 28 Mar 2024
शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद? प्रवीण दरेकर म्हणाले, "जागावाटपावरून…"

महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर न झाल्यामुळे तीनही घटक पक्षांमध्ये वाद असल्याच्या चर्चेवर आज भाजपा नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जागावाटपावरुन शिंदे-फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या संदर्भातील बातम्या धादांत खोट्या आहेत. उलटपक्षी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा एकत्रितपणे एक-एक जागा कशी निवडून येईल याची आखणी करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

13:54 (IST) 28 Mar 2024
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा

मेट्रो स्थानकांच्या नावातून उत्पन्न मिळविण्याचा अनोखा मार्ग महामेट्रोने शोधला आहे. सध्या सहा मेट्रो स्थानकांच्या नावात कंपन्यासह इतर संस्थांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 28 Mar 2024
रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

नागपूर: रामटेक या अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

वाचा सविस्तर...

13:42 (IST) 28 Mar 2024
डोंबिवलीतील नांदिवलीत वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा गाळ्याचे बांधकाम; शाळा, व्यापारी संकुलांच्या वाहनांना अडथळा

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील मुख्य वर्दळीच्या सर्वोदय रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याचा अर्धा भाग अडवून बेकायदा गाळ्याची उभारणी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

13:28 (IST) 28 Mar 2024
नवी मुंबई: बारमध्ये काम करणाऱ्याची हत्या

आज पहाटे नवी मुंबईतील जुहूगाव येथील एका बार मधील कामगाराची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 28 Mar 2024
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : मालवणी अनधिकृत बांधकामांनी ग्रस्त

पश्चिम उपनगरातील मालाड हा सर्वाधिक लोकसंख्येचा भाग म्हणून ओळखला जातो. मालाड पश्चिमेला लागून असलेल्या मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामे ही या परिसरातली मोठी समस्या आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 28 Mar 2024
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जातीचे नागरिक धारावी मतदार संघात राहत असले, तरी धारावी पुनर्विकासाच्या मुद्दा त्या सर्वांनाच जोडणारा आहे.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 28 Mar 2024
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : छेडछाडीमुळे एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात घडली. युवतीची छेड काढणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

13:00 (IST) 28 Mar 2024
‘स्कायवॉक’साठी १५ महिन्यांची मुदत, वांद्रेतील बांधकाम प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दीवरील तोडगा असलेल्या आकाशमार्गिकेचे (स्कायवॉक) बांधकाम पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला बुधवारी १५ महिन्यांची मुदत दिली. तसेच, या मुदतीतच बांधकाम पूर्ण करण्याचेही बजावले. त्याचवेळी, या आकाशमार्गिकेच्या बांधकामाबाबत पुन्हा एकदा न्यायालयाची दिशाभूल होऊ नये यासाठी कामाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच या आकाशमार्गिकेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि ना हरकत प्रमाणपत्रांमुळे काम सुरु झाले नाही. परंतु, येत्या १५ महिन्यात किंवा त्याआधी आकाशमार्गिकेचे काम पूर्ण करू, असे महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील अनिल सिंग यांनी न्यायालयाला आश्वासित केले. मात्र, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या या आश्वासनावर शंका उपस्थित केली. तसेच, ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो का, असा प्रश्न केला. आकाशमार्गिकेचे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी यापूर्वीही दिले होते. मात्र, पालिका आश्वासन देते आणइ शब्द पाळत नाही, असा टोलाही मुख्य न्यायमूर्तींनी हाणला.

12:45 (IST) 28 Mar 2024
विजय शिवतारे - अजित पवारांचे मनोमिलन? चित्रा वाघ यांचा सुळेंना टोला

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मागच्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक फोटो ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच या फोटोसह "एक एकेला फडणवीस क्या करेगा?" असे कॅप्शन लिहून खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1773226403149889582

12:36 (IST) 28 Mar 2024
कोल्हापुरात छत्रपती-मंडलिक घराणे १५ वर्षांनंतर पुन्हा समोरासमोर

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये १५ वर्षानंतर पुन्हा एकदा छत्रपती आणि मंडलिक या तुल्यबळ घराण्यामध्ये सामना होत आहे. त्यावेळीही एका घरातील पिता विरुद्ध दुसऱ्या घरातील मुलगा अशी लढत होती. यावेळी उलटफेर होऊन अशाच प्रकारची लढत होत आहे. मागील लढतीत मंडलिक घराण्याने छत्रपती घराण्यावर मात केली होती.

वाचा सविस्तर...

Mumbai Maharashtra News Live in Marathi

महत्त्वाच्या घडामोडी आणि देशभरातील बातम्या वाचा