Mumbai Maharashtra News Live Today : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी आपल्या बहुसंख्या जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. आज महायुतीच्या जागा वाटपांचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती काल (दि. २७ मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही जागांवरून धुसफुस सुरू आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू नाराज आहेत. तर सांगलीमध्ये शिवसेनेने चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस नाराज आहे. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून दिवसभरात घडणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Updates 28 March 2024

12:11 (IST) 28 Mar 2024
माझी उमेदवारी पक्की; खासदार धैर्यशील माने यांची माहिती

खासदार माने यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्याचे संदेश समाज माध्यमात अग्रेषित केले जात आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 28 Mar 2024
“वेळ येईल तेव्हा अजित पवारांची सर्वात आधी साथ सुनील तटकरेच सोडतील”, रोहीत पवार यांची टीका

अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी केली.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 28 Mar 2024
मुंबई : बेकायदेशीर बांधकामांना अभय नाही, घणसोलीतील चारमजली इमारत पाडण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

बेकायदेशीर आणि अनियमितता यात फरक असल्याचे नमूद करून बेकायदा बांधकाम नियमित करण्यास परवानगी देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 28 Mar 2024
शवविच्छेदनातील निष्काळजीपणा डॉक्टरला महागात; कायदेशीर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, पोलिसांना आदेश

हत्येच्या प्रकरणात शवविच्छेदन करताना निष्काळजीपणा आणि अनियमितता दाखविणे ठाणेस्थित डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 28 Mar 2024
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारकीची उमेदवारी का नाकारली?

नागपूर : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची चौथी यादी जाहीर केली असून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने येथून लढण्याची सूचना केली होती. परंतु पटोले यांनी राज्याच्या राजकारणात रस असल्याचे सांगून उमेदवारी घेण्याचे टाळले. मात्र, विरोधकांनी पराभवाच्या भितीने पटोले यांनी लोकसभा लढण्याचे टाळले, अशी टीका केली आहे.

वाचा सविस्तर…

11:44 (IST) 28 Mar 2024
अकोल्यात लढत दुरंगी की तिरंगी? दोन ठिकाणी ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेस…

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून स्वत:ची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परंपरेनुसार वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व भाजपचे अनुप धोत्रे यांच्यात लढत होणार आहे. ‘वंचित’ आणि ‘मविआ’तील आघाडीची शक्यता मावळल्याने आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

वाचा सविस्तर…

11:39 (IST) 28 Mar 2024
पिंपरी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर, चौघांना अटक; पिस्तूल, दोन कोयते जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 28 Mar 2024
उष्माघाताचा धोका वाढला! राज्यात १३ रुग्णांची नोंद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप

राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविली आहेत.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 28 Mar 2024
देशातील गव्हाचा निच्चांकी साठा, जाणून घ्या नेमके कारण काय?

देशातील गव्हाचा साठा मागील १६ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 28 Mar 2024
विदर्भ, मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा इशारा; तापमानात होणार वाढ

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 28 Mar 2024
कोपर रेल्वे स्थानकाजवळ पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू

कोपर रेल्वे स्थानकानंतर लोकलने वेग घेताच पोलिसाचा तोल गेला आणि तो रेल्वे मार्गात पडून मरण पावला.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 28 Mar 2024
“…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही

भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र गेल्या काही निवडणुकीत इथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 28 Mar 2024
“४०० मधली एखादी जागा कमी झाली तर…”, बच्चू कडूंचं भाजपाला आव्हान

ज्यांनी भाजपाचं कार्यालय फोडलं त्यांनाच तिकीट देण्याची लाचारी का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ज्यांनी शिवीगाळ केली त्यांनाच आज पायघड्या घातल्या जात आहेत. कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचं हे एकदा निश्चित झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. अबकी बार ४०० पार ही घोषणा आहे, एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी आणि देशभरातील बातम्या वाचा