राज्यातील नव्या सरकारचा प्रथम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविल्या आहेत. या करीता व्हॉटस अ‍ॅपचा विशेष क्रमांक त्यांनी जाहीर केला असून फेसबुक, इ-मेल, तसेच अर्थ मंत्रालयाच्या संकेतस्थळाचा उपयोग करून लोकांनी आपल्या अपेक्षा व सूचना सरकारला कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Story img Loader