महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. त्यांनी यामागचं कारणही स्पष्ट करून सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणात आपल्या पक्षाच्या नेत्याचं कौतुक होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेत्यांना बाके वाजवून त्याचं स्वागत केलं.

नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई शहरातून येणार वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह एकूण १५ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या चार वर्षांत हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा : पुण्यातील ट्राफिकची चिंता मिटणार, राज्य सरकार उभारणार रिंग रोड

यासंदर्भात गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. केंद्रीय रस्ते निधीमधून राज्याला १२०० कोटी रूपये देण्याचं कबुल केलं आहे. त्याबद्दल मी नितीन गडकरी यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या या मदतीचा राज्याला निश्चितच फायदा होणार आहे. त्याच बरोबर पुण्यातील रिंग रोडची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्यासाठी खर्च करावी, रस्ते उभारणीचा खर्च केंद्र सरकार करेल, असेही गडकरींनी सांगितल्याचं, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केलं. या सगळ्यबद्दल मी नितीन गडकरी यांचं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो, असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader