महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली. तर, हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचत्वात विलीन केलय” असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
Maharashtra Budget 2022 Live : राज्यात CNG स्वस्त; अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे आता याला योगायोग म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. परंतु नेहमी अर्थमंत्री बजेट मांडतात आणि त्यानंतर पहिले विरोधी पक्षाची प्रतिक्रिया होते, इथे मात्र ज्यांनी बजेट मांडलं ते पहिल्यांदा प्रतिक्रिया देण्यासाठी आले आणि विरोधी पक्ष आला तर इंटरनेट बंद आहे. पण आपण असं समजूया की हा योगायोग आहे. खरं म्हणजे कळसूत्री सरकारने विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने या महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे आणि दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील दीन,दलित,गरिब,आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा बलुतेदार, सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे.”
तसेच, “आताचं जे बजेट या मांडलं आहे, हे देखील कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावी, इतपत चार बातम्या तयार होऊ शकतात. या व्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही. विशेषता मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या, चालू कामांच्याच घोषणा या बजेटमध्ये करायच्या, आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या योजनाच पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वर्षामध्ये आमच्या सगळ्या योजना बंद करणारं सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मग समृद्धी महामार्ग असेल, ज्याचा विरोध आताचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी केला होता. मुंबईतली मेट्रो असेल, मेट्रो थ्री, ट्रान्सहार्बर लिंक, वेगवेगळे जे प्रकल्प आहेत त्या सगळ्यांना बुलेट ट्रेनसह विरोध करणारं सरकार आता त्याच संदर्भात पुन्हा घोषणा करत आहे. हे पाहून आनंद मानावा की दु:ख वाटावं हे समजत नाही.” असं म्हणत फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
Maharashtra Budget 2022 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल – मुख्यमंत्री
याचबरोबर, “खरं म्हणजे विशेषता शेतकऱ्यांना या बजेटने काहीच दिलं नाही. दोन वर्षांपूर्वी ज्याची घोषणा केली होती. ते ५० हजार रुपयांचं प्रोत्साहन हे आज देण्यात येतय, अशी घोषणा केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो शेतकरी मागील दोन वर्षांमध्ये उध्वस्त झालाय, त्या शेतकऱ्याला कुठलीही मदत सरकारने केली नाही.” असा आरोपही फडणवीस यांनी केला.