Maharashtra Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकारकडून आज (शुक्रवार)राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प केला आहे. यावेळी त्यांनी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी राखून ठेवला असल्याची घोषणा त्यांनी केली.
”महाराष्ट्र सरकारने लता दिनानाथ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला होता. तर, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमिपूजन होऊ शकले नाही. परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलीना येथील तीन एकरचा भूखंड या महाविद्यलयासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल”, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ हे प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाने केलेली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
या केंद्रासोबतच विद्यापीठात लता मंगेशकर यांच्या नावे सुवर्णपदक बहाल केले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आलेले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी संशोधन केले जाणार आहे.मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात स्थापन होणाऱ्या एक्सलेंस सेंटरमध्ये अद्ययावत स्टुडिओ, सांगितीक उपकरणे, तांत्रिक सोयी-सुविधा असतील. यानिमित्ताने परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय सुगम संगीत क्षेत्रातील संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे. लता मंगेशकर यांच्या कार्यावर शास्त्रोक्त अध्ययन करण्यासाठी संगीत विभागात त्यांच्या नावे अध्यासन स्थापन केले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून लता मंगेशकर यांच्या संगीत विश्वातील कार्यावर सखोल अध्ययन आणि संशोधन केले जाणार आहे, असे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.