Maharashtra News, 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

Live Updates

Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

14:23 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून

– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

– ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार

– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

14:22 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी…

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूरसाठी, धाराशिवसाठी उजणी धरणातून वॉटर ग्रीड निर्माण करण्याचं काम चालू आहे.

14:21 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: प्रगतीपथावरील २६८ सिंचन प्रकल्पापैकी या वर्षी ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन

प्रगतीपथावरील २६८ सिंचन प्रकल्पापैकी या वर्षी ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन

14:20 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: तापी महापुनर्भरण प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.

तापी महापुनर्भरण प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.

14:19 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण केलं जाईल. दीड लाख शेतकऱ्यांना सौरकृषीपंप लावून दिले जातील. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना २०२४ मार्चपर्यंत मुदतवाढ

14:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मच्छीमार विकास निधीची घोषणा…

प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरच्या प्रभावित मच्छीमारांच्या कल्याणासाठी प्रकल्पाच्या दोन टक्के किंवा ५० कोटींचा मच्छीमार विकास निधी स्थापन केला जाईल.

14:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने २०१९मध्ये वेगवेगळ्या २२ योजनांचा १ हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेतला होता. आवश्यक तो निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल.

14:15 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: कार्यक्रम खर्चासाठी निधीची तरतूद

कार्यक्रम खर्चासाठी कृषी विभागाला ३ हजार कोटी रुपयांचा निधी, अन्न व नागरी पुरवठा विभागास ४९१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

14:14 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: पंचनाम्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

नैसर्गित आपत्तीमुळे नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत दिली. ७ हजार ९३ रुपये निधी देण्यात आला. शेतपीक नुकसानीसाठी आता ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू करण्यात आले. नैसर्गित आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा केला जाईल. सर्वेक्षणासाठी उपग्रह व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल.

14:12 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: महाराष्ट्र श्री अन्न अभियान

२०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष – महाराष्ट्र श्री अन्न अभियान. त्यासाठी श्री अन्न केंद्र स्थापन केलं जाईल.

14:12 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना – यात अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास २ लाखांपर्यंतचं सानुग्रह अनुदान. आगामी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं जाईल.

14:10 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार

मागेल त्याला शेततळे यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध करून दिले जातील. यासाठी १ हजार कोटींची तरतूद

14:09 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरीत पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील. मधल्या काळात लाभ मिळाले नव्हते.

14:09 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

महाकृषीविकास अभियान योजनेची घोषणा. पाच वर्षांत ३ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील

14:08 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे. १२ हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम देण्यात आली.

14:08 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

२०१६च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्याच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरेल. शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरूप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद

14:07 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: पहिले अमृत शेती विकासावर…

कांदा उत्पादकांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा. यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांत राज्य सरकार अजून ६ हजारांची भर घालेल. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १,१५,००० शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी ६,९०० कोटींची तरतूद

14:06 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला…

पाच ध्येयांवर आधारीत पंचामृत

१ – शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

२- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

३ – भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

४ – रोजगार हमीतून विकास

५ – पर्यावरणपूरक विकास

14:05 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: १ ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मानस

भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियनचा वाटा महाराष्ट्राचा असावा असा आमचा मानस आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

14:04 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये

मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल. यासाठी २५० कोटींचा निधी

14:02 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: देवेंद्र फडणवीसांचा पहिला अर्थसंकल्प…

भारताच्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. भारताला संविधानच नाही, तर अर्थकारणावरही मार्गदर्शन केलं त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तकाचं शताब्दी वर्ष आहे – फडणवीस

14:02 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतो – देवेंद्र फडणवीस

14:01 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: फडणवीसांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात…

13:53 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: थोड्याच वेळात अर्थसंकल्प मांडला जाणार!

थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतील…

13:51 (IST) 9 Mar 2023
गुलाबराव पाटलांनी नागालँडचा मुद्दा काढताच अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यांना आम्ही ओळखतो, प्रत्येक गोष्टीत…!”

अजित पवार म्हणतात, “मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत…!”

वाचा सविस्तर

13:51 (IST) 9 Mar 2023
“अजितदादा, तुम्ही तसे चांगले आहात, पण..”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत टोलेबाजी; म्हणाले, “शीशे के घरों में..!”

एकनाथ शिंदे म्हणतात, “शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. ते आत्तापर्यंत जे काही बोलले, त्याच्या नेमकं उलटं घडलंय हे…!”

वाचा सविस्तर

13:27 (IST) 9 Mar 2023
उपराजधानीचे कृत्रिम सौंदर्य दाखवण्यासाठी अनेकांच्या पोटावर पाय!

नागपूर : उपराजधानीत ‘जी-२०’ ची बैठक तोंडावर असल्यामुळे शहरातील कृत्रिम सौंदर्य दाखवण्यासाठी मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाच्या दबावाखाली अनेक आक्रमक निर्णय घेण्यात येत आहेत. नुकताच पोलीस आयुक्तांनी शहरातील भिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश जारी करीत अनेकांच्या पोटावर लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पासह विधानभवनात दाखल झाले आहेत.

13:10 (IST) 9 Mar 2023
छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारचे मानले आभार

राज्य सरकारच्यावतीने 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'स्वराज्यरक्षक' असा उल्लेख केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे आभार मानले.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२०२४ लाइव्ह (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)