Maharashtra News, 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.
Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
नागालँडमध्ये पाठिंबा न मागताही तुम्ही दिला. २०१४लाही तुम्ही इथे ते केलं होतं. त्याामुळे शीशे के घरोंमे रहनेवालोंने दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेंका करते. सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात. आम्ही बोलत नाही. पण समोरूनही रोज रोज तुम्ही बोलत राहाल, तर उत्तर मिळणार – एकनाथ शिंदे</p>
तुम्ही म्हणालात की सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवली. मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्य नव्हते का? त्यांनी तर तुमच्या बालेकिल्ल्यात तुम्हाला जागा दाखवली. अजितदादा, तसे तुम्ही चांगले आहात. रोखठोकमध्ये आहात. पण तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. समोरच्याला बरोबर लागेल असं. पण तसं होत नाही – एकनाथ शिंदे
भुजबळसाहेब, तुम्ही काय म्हणालात? मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. म्हणजे सरकारला नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. हे कुठलं तत्वज्ञान? आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं ठेवायचं वाकून. असं कसं चालेल? शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. ते आत्तापर्यंत जे काही बोलले, त्याच्या नेमकं उलटं बोलले हे आपल्याला माहिती आहे. कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपानं जिंकली. ते ते विसरले. – मुख्यमंत्री
अजितदादा, गुलाबराव पाटलांनी नागालँडचा विषय काढला, तो आजचा विषय नव्हता खरंतर. पण जसं तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता.. ऐका.. तुम्हीही ऐकायची सवय करा. एवढंच आहे की जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे आत्तापर्यंत बोलत होतात. बदलाचे वारे वाहात आहेत, गुलाबराव पाटलांनी एवढंच विचारलं की हे बदलाचे वारे आहेत का? – एकनाथ शिंदे
कामकाज पत्रिकेत खोक्याचा कोणताही विषय नाही. दिलेली माहिती तपासून घेतली जाईल. चुकीची असेल, तर रेकॉर्डवरून काढली जाईल – राहुल नार्वेकर
मंत्री चुकीची माहिती सभागृहात देत आहेत. राष्ट्रवादीकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की तिथे स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा देण्यात आलाय. भाजपाला नाही. हे तर बेगानी शादी में अब्दुल्लाह दिवाना असं चाललंय. तिकडे रिओ मुख्यमंत्री आहेत. यांचा काहीही संबंध नाही. – छगन भुजबळ
नागालँडमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही – अजित पवार
मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय? – अजित पवार
नागपूर : रामदासपेठेतील एका हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर मुंबईचा एक निवृत्त अधिकारी थांबला होता. या अधिकाऱ्याच्या भेटीसाठी पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यांतील आरटीओच्या अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने विविध चर्चेला पेव फुटले होते. आवडीच्या ठिकाणी बदलीसाठीचा हा खेळ असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य टीव्हीत बघत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहेत. नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का? – गुलाबराव पाटील
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका विक्रीसाठी असलेली दहा वर्षांची अट शिथिल होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सविस्तर वाचा…
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आज आमदारकीची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंबद्दल एकच सांगेन, दिलदार मनाचा राजा – असं धंगेकर म्हणाले आहेत.
राज्यातील आगामी छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली राज्याच्या विकासाच्या मॉडेलची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे. सविस्तर वाचा…
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा गुंडांशी संबंध असल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दिवसेंदिवस ढासळारी हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यांत्रिकी झाडू खरेदीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. आता नवीन नऊ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…
मुंबई महा मेट्रो संचलन महामंडळ मर्यादितने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिकांवर तिकिटाखेरीज अन्य स्रोतातून महसूल मिळविण्यासाठी निवडक मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार व्यावसायिक कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी चालू आहे. विधानसभा अध्यक्षांनी सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांची मागणी फेटाळली. आम्ही मोठी मदत केल्याचं खोटं रेटून बोलणं ही सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप भाजपाचं सरकार करतंय – नाना पटोले
अवकाळीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आज सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावरची विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीवरून विरोधी पक्षांकडून विधानसभेत घोषणाबाजी, सत्ताधारी-विरोधकांकडून आक्रमक भूमिका
तुमच्यासारखं आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं नाही पुसली. आम्ही १२ हजार कोटी रुपये दिले. तुम्ही ५० हजार कोटी रुपये देतो म्हणाले, पण दिले नाही. आम्ही दिले ते – एकनाथ शिंदे
एक लाख एकर क्षेत्र हवामान खराब झाल्यामुळे बाधित झालं आहे. आज सगळ्या विभागाचे आकडे आले आहेत. मुख्यमंत्री आश्वासन देतात की कांद्याची खरेदी सुरू झालीये, तशी ती झालेलीच नाहीये. बळीराजा त्रासलेला आहे. किंमती घसरल्यामुळे हस्तक्षेप करून खरेदी सुरू केली पाहिजे. सरकार म्हणतंय खरेदी सुरू झाली, पण तशी परिस्थिती नाहीये – अजित पवार
पंचनामे पूर्ण होतील, तशी त्यांना तात्काळ मदत दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. आपल्याला त्यांना मदत करायचीये की फक्त सभागृहात गोंधळ घालायचाय? कुणीही राजकारण करू नये. सरकार आणि विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायची ही वेळ आहे – एकनाथ शिंदे
नुकसान झाल्यावर तुम्ही म्हणालात पंचनामे केले पाहिजेत. अवकाळी, गारपिटीमुळे जे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करायच्या सूचना दिल्या. हे पंचनाम्याचं काम काही प्रमाणात झालंय, काही प्रमाणात चालू आहे. सभागृहाची जी भावना आहे तीच सरकारची आहे. आपण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे का? आपण पैसे देणार नाही असं नाहीये. यापूर्वीही आपण निकषांवर बोट ठेवून भरपाई दिलेली नाही – एकनाथ शिंदे
नागपूर : ऐतिहासिक अशा नागपूर जिल्ह्याला अनेक परंपरांसोबत शंकरपटाचीही परंपरा आहे. जिल्ह्यातील सावरगावमध्ये शिंदे कुटुंबियांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या शंकरपटाला ७१ वर्षांची परंपरा असून येत्या रविवारी होणाऱ्या शंकरपटात दीडशेहून अधिक जोड्या एकाचवेळी धावणार आहेत. सुमारे पन्नास हजार लोकांच्या उपस्थित होणाऱ्या या शंकरपटाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
वर्धा : ज्या ठाणेदाराकडे न्याय मागायला जातात, त्यानेच अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडली आहे. स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा ठाणेदार सापडलेला आहे.
पुणे: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्त्याला होणार आहे.
अवकाळीवर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्य आमदारांनी सभागृहात आक्रमक होत घोषणाबाजीला सुरुवात केली.
विरोधकांनी अवकाळी पावसाच्या परिस्थितीवर बोलण्यासाठी मांडला स्थगन प्रस्ताव. अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आक्रमक…
हवामान खात्याचं म्हणणं आहे की आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प जसा महत्त्वाचा आहे, तसाच हाही विषय महत्त्वाचा आहे – अजित पवार
खरंच परिस्थिती इतकी गंभीर झालीये की कृषीमंत्र्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कुठल्याच भागात हे घडू नये. पण ते दुर्दैवानं घडतंय. आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने ते कामकाज संपल्यावर सरकार निवेदन करेल. पण काहीही झालं नाही… – अजित पवार