राज्यातल्या नवीन सरकारने म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकार देखील ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी, तसेच पंचनाम्यांबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने आणि तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेतली जाणार असल्याचं अर्थमंत्री फढणवीस यांनी यावेळी सांगितलं.
१ रुपयात पीकविमा मिळणार
शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जाणार. त्यामुळे आता शेतकर्यांवर कोणताच भार नसेल, राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता भरणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा मिळेल. यासाठी राज्य सरकार ३,३१२ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.
हे ही वाचा >> प्रेयसीने दिली ‘अशी’ धमकी, नव्या नवरीला कारमध्येच सोडून पळून गेला नवरदेव, नवरीनेही केला पाठलाग…
शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
२०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ दिले जाणार. यानुसार १२.८४ लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात ४,६८३ कोटी रुपये थेट जमा केले जातील.