Maharashtra Budget 2024-25 Rohit Pawar on : महायुती सरकारने अर्थसंकल्पासाठी ८३ लाख रुपयांच्या बॅग्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. डिजिटल युगात महायुतीच्या सरकारने अशा प्रकारे बॅग खरेदीचा निर्णय घेतल्याचे पाहून विरोधकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या ट्रॉलीबॅग खरेदीच्या निर्णयावरून यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी यावर तटस्थ प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते मात्र अद्याप कित्येक शेतकऱ्यांना पीडीत कुटुंबांना शासकीय मदत मिळालेली नाही दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या आमदारांना, एकंदरीतच सर्व आमदारांना बॅग देण्यासाठी ८३ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, जर बॅगांची गरज नसेल तर आमदारांनी त्या बॅगेचा त्याग करावा. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या सरकारने अशा प्रकारे वायफळ खर्च करण्यापेक्षा या चुकीच्या प्रथा पुढे नेण्यापेक्षा नवे बदल करणे गरजेचे आहे माझी बॅग मला देण्याऐवजी तो खर्च योग्य ठिकाणी वापरावा, अशी मी सरकारकडे विनंती करत आहे”.
शिवसेनेची तटस्थ प्रतिक्रिया?
दरम्यान, अंबादास दानवे म्हणाले, “ही ८३ लाख रुपयांची बाब आत्ता समोर आली आहे. दरवर्षीच आमदारांना अशा प्रकारच्या बॅगा दिल्या जातात. त्या बॅगांची किंमत कमी जास्त होत असेल, मात्र ही एक नेहमीचीच प्रथा आहे.