Vidhan Sabha Monsoon Session Maharashtra Budget 2024: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यातली एक घोषणा वारकऱ्यांसाठीही करण्यात आली. २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रती दिंडी निधीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त बजेटमध्ये केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्पाची सुरुवात अभंगाने

अर्थमंत्री अजित पवार यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या. देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली. शनिवारी आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघेल. महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: उद्धव ठाकरेंची बजेटवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा अर्थसंकल्प म्हणजे…”

प्रति दिंडी २० हजार रुपयांच्या निधीची घोषणा

२०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मोफत औषधं दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजितदादांनी यावेळी केली. अजितदादांनी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याने आणि मोफत औषध देण्यात येणार असल्याने वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

वारकऱ्यांना माफक दरात मिळणार जेवण

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आजपासून उपहार गृह सुरू करण्यात आले आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासात माफक दरांत जेवण मिळणार आहे. पंढरपुरात भाविकांची हॉटेलधारकांकडून होणारी लूट यामुळे थांबण्यास मदत होणार आहे. भाविकांना उपहारगृहात फक्त शंभर रुपयात पोटभर जेवण मिळेल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. २०२४-२०२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प त्यांनी मांडला. मध्य प्रदेशातल्या लखपती दीदी प्रमाणेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली. महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवणार आहो असं त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृयोजना आपण आणल्या आहेत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget 2024establish varkari sampradaya corporation 20 thousand will be given per dindi declaration of ajit pawar scj