Deputy CM Ajit Pawar Budget 2025 Speech LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत असून नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असेल? याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होणार का? याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात व बाहेरदेखील अर्थसंकल्पावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा दिसून आला.
इथे पाहा भाषणासह अधिवेशन कामकाजाचा व्हिडीओ
Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचे सर्व अपडेट्स!
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व इतर महत्त्वाची शहरं विमानतळाशी जोडली जाणार आहेत. बाळकुंभ ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून त्याचे ३३६४ कोटींचे खर्चाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
पवना ते पात्रादेवी हा ७६० किमी लांबीच्या ८६ हजार ३०० कोटी किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कामे प्रगतीपथावर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळादरम्याच्या मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केलं जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होईल – अजित पवार
समृद्धी महामार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण झालं असून त्यासाटी ६४ हजार ७५५ कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकची कामं पूर्ण झाली असून टप्पा दोन अंतर्गत ९६१० किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची कामं मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ७ हजार किमी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ३५८२ गावं १४ हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा-राज्य-राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. याची एकूण किंमत ३०१०० कोटी आहे. पहिल्या टप्प्यात ८ हजार कोटींची कामं करण्यात येणार आहेत – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत ६५०० किमी लांबीची ५६७० कोटी किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी ३७८५ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षासाठी १५०० किमी लांबीच्या रस्त्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
अमृतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या आराखड्यात पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ, गडकिल्ले, ५ हजारांहून जास्त लोकसंख्येच्या वसाहती, सर्व जिल्हा व तालुका मुख्यालये जोडण्यासाठी रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. आशियायी विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा एक पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३ हजार ९३९ कोटी किमतीची ४६८ किमी रस्ते सुधाराची कामं हाती घेतली आहेत. त्यातली ३५० किमीची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा तीन अंतर्गत ७५५ किमी लांबीची ६५८९ कोटी किमतीची २३ कामे हाती घेण्यात आली आहेत. ६ हजार किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी ३६ हजार ९६४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
दिघी, वेंगुर्ला, डोंबिवली, मीरा भाईंदर, ठाणे येथील जेट्टीची कामं प्रगतीपथावर आहेत. हवामान बदल व इतर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी किनारी जिल्ह्यांत ८ हजार ४०० कोटींचा बाह्र सहाय्य प्रकल्प राबवला जाणार आहे – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीसाठी सुसज्ज जेट्टीसाठी २२९ कोटी २७ लाख रुपये किमतीचं काम चालू आहे – अजित पवार
गेट वे ऑफ इंडियाहून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त बोटींना आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं जाईल – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
वाढवण बंदरामुळे ३०० दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणीची क्षमता निर्माण होईल. जेएनपीटी बंदराच्या क्षमतेपेक्षा ती तीन पट आहे. या बंदराचा समावेश जगातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या पहिल्या दहा बंदरांमध्ये होईल. या बंदराजवळ मुंबईतलं तिसरं विमानतळ आणि बुलेट ट्रेनचं स्थानकही बंदराला लागून असेल – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
बंदरांच्या करारांचा कालावधी वाढवून ९० वर्षे करण्यात आला आहे – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, उर्जा या क्षेत्रांत येत्या ५ वर्षांत विक्रमी गुंतवणूक करण्याचा विचार – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
पुढील वर्षाच्या कार्यक्रम खर्चासाठी उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी, कामगार विभागास १७१ कोटी, वस्त्रोद्योग विभागास ७७४ कोटी तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्य विभागास ८०७ कोटींचा निधी प्रस्तावित आहे – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
नव्या उद्योगांसाठी १७ ठिकाणहून घ्याव्या लागणाऱ्या १४१ सुविधा ‘मैत्री’ अंतर्गत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
नागपूरमध्ये अर्बन हाटची स्थापना केली जाईल – अजित पवार
Arthsankalp Adhiveshan 2025:
येत्या पाच वर्षांत वीज खरेदीत १ लाख १३ हजार कोटींची बचत होणं अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं प्रमाण १५.४ टक्के आहे – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी शासन प्रयत्नशील असल्याने मोठी गुंतवणूक राज्यात होत आहे – अजित पवार

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही – अजित पवार
महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही – अजित पवार

Arthsankalp Adhiveshan 2025:
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे असा मोदींचा संकल्प आहे. त्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech: भाषणाच्या सुरुवातीलाच मानले मोदींचे आभार
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे राज्यातील अनेक प्रकल्पांना भरीव तरतूद मिळणार आहे. त्यासाठी मी जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानतो – अजित पवार

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
जनतेनं महायुतीला बहुमताचा कौल दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मतदारांचा विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुती सरकारकडून होईल – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech: अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात
अर्थमंत्री अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात…
Deputy CM Ajit Pawar Budget Speech: अवकाळी व गारपिटीच्या नुकसानभरपाईची काय आहे स्थिती?
जानेवारी ते मे २०२४ या काळात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई जास्तीत जास्त ३ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आली. राज्यात त्याअंतर्गत ४ लाख ९५ हजार शेतकऱ्यांना २ लाख ८८ हजार हेक्टर बाधित शेतजमिनीसाठी ७९७.९४ कोटींची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. जून ते सप्टेंबर काळातील या नुकसानभरपाईचा आकडा ५० लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ३७ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रासाठी १४७०.९२ कोटी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.
Deputy CM Ajit Pawar Budget Speech: महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात किती पाऊस पडला?
राज्यात २०२४ च्या मान्सूनमध्ये ११६.८ टक्के पाऊस पडला. राज्यात २०३ तालुक्यांमध्ये अतिरिक्त तर ६८ तालुक्यांमध्ये सरासरी आणि ८४ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: यंदाच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट किती
२०२४-२५ साठी वित्तीय तूट २.४ टक्के तर महसुली तूट ०.४ टक्के इतकी अंदाजित करण्यात आली आहे.
Deputy CM Ajit Pawar Budget Speech: चालू वर्षात महसुली खर्च किती?
२०२४-२५ साठी राज्याचा महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी तर २०२३-२४ साठीचा सुधारित खर्च अंदाज ५ लाख ०५ हजार ६४७ कोटी आहे.
आर्थिक सर्वेक्षण २०२५ | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ (प्रातिनिधिक छायाचित्र)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५