Deputy CM Ajit Pawar Budget 2025 Speech LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत असून नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असेल? याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होणार का? याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात व बाहेरदेखील अर्थसंकल्पावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा दिसून आला.

(10-03-2025) Maharashtra Assembly Live | Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५

इथे पाहा भाषणासह अधिवेशन कामकाजाचा व्हिडीओ

Live Updates

Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचे सर्व अपडेट्स!

11:10 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Economic Survey 2025: राज्याचा महसुलाचा अंदाज किती?

आर्थिक पाहणी अहवालात २०२४-२५ साठी राज्याच्या महसुली जमेचा अंदाज ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी नमूद करण्यात आला आहे. २०२३-२४ साठी सुधारित अंदाज ४ लाख ८६ हजार ११६ कोटी आहे. याशिवाय करमहसूल व करेतर महसूल यांच्यासाठीचे अंदाज अनुक्रमे ४ लाख १९ हजार ९७२ कोटी व ७९ हजार ४९१ कोटी आहेत.

10:35 (IST) 10 Mar 2025
Maharashtra Economic Survey 2025: महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल

महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्यात सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास ८.७ टक्के, उद्योग क्षेत्राचा विकास ४.९ टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास ७.८ टक्के असेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

10:30 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: ३० टक्के खर्च कपात

सुमारे दोन लाख कोटींची वित्तीय तूट, निवडणुकीपूर्वी सवंग निर्णयांची करण्यात आलेली खैरात यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली. यामुळेच यंदाच्या आर्थिक वर्षात फक्त ७० टक्के खर्च करून ३० टक्के कपात करावी लागली आहे.

10:30 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: लाडक्या बहिणींच्या अनुदानात टप्प्याटप्प्याने वाढ होणार?

जाहीरनाम्यातील आश्वासन पाच वर्षांच्या काळात पूर्ण करायचे असते, असे सूचक विधान मध्यंतरी महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अनुदानात सरसकट १५०० रुपयांवरून २१०० रुपयांची म्हणजे ६०० रुपयांची वाढ होते की टप्प्याटप्प्याने वाढ केली जाते हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल.

10:29 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025: लाडक्या बहिणींसाठीचा निधी ६४ हजार कोटींपर्यंत वाढणार?

सुमारे अडीच कोटी महिलांना सध्या अनुदान दिले जात असून त्यासाठी वर्षाला ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आता लाभार्थींची संख्या नऊ लाखांनी कमी झाली आहे. मात्र तरीही दरमहा २१०० रुपये अनुदान केल्यास खर्च ६४ हजार कोटींवर जाऊ शकतो.

10:28 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: ग्रामीण भागात काँक्रिटीकरण

ग्रामीण भागांत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सवलती देण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे.

10:28 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025: नमो शेतकरी योजनेच्या पैशात वाढ होणार…

‘नमो शेतकरी सन्मान योजने’त वार्षिक तीन हजार रुपये वाढ करून ते १५ हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केली असल्याने याचा अर्थसंकल्पात समावेश असण्याची शक्यता आहे.

10:27 (IST) 10 Mar 2025

Ajit Pawar: अजित पवार आज जयंत पाटलांना मागे टाकणार; अर्थसंकल्पाच्या यादीत दुसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानी कोण?

Ajit Pawar Budget 2025: महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या यादीत अजित पवार दुसऱ्या स्थानी आहेत.

वाचा सविस्तर

10:27 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025: सर्वाधिक अर्थसंकल्प कुणी सादर केले?

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत सादर झालेल्या एकूण ७८ अर्थसंकल्पांपैकी सर्वाधिक १३ अर्थसंकल्प हे माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केले आहेत. शेषराव वानखेडे सर्वप्रथम १९५७ साली मुंबई प्रांत निवडणुकीत तर १९६२ साली संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीत कमवेश्वर मतदारसंघातून सर्वप्रथम निवडून आले होते.

10:26 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech: अजित पवार ११व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

महाराष्ट्रात आजपर्यंत ७८ वेळा अर्थसंकल्प सादर झाले असून त्यात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार हे दुसऱ्या स्थानी आहेत. अजित पवारांनी आजपर्यंत त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात १० वेळा अर्थसंकल्प सादर केले असून आज त्यात ११ व्या अर्थसंकल्पाची भर पडणार आहे. जयंत पाटील यांनी १० अर्थसंकल्प सादर केले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. हे दोघे नेते अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

10:21 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025: अजित पवार जयंत पाटलांना मागे टाकणार

जयंत पाटलांनी आजपर्यंत १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यावेळी ११व्यांदा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

10:20 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech: अर्थसंकल्पाला मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाची महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५ ला मंजुरी, दुपारी २ वाजता विधानसभेत सादर होणार…

10:19 (IST) 10 Mar 2025
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: अजित पवार मांडणार अर्थसंकल्प

अर्थमंत्री अजित पवार दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार…

आर्थिक सर्वेक्षण २०२५ | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ (प्रातिनिधिक छायाचित्र)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५