Deputy CM Ajit Pawar Budget 2025 Speech LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत असून नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असेल? याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होणार का? याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात व बाहेरदेखील अर्थसंकल्पावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा दिसून आला.

(10-03-2025) Maharashtra Assembly Live | Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५

इथे पाहा भाषणासह अधिवेशन कामकाजाचा व्हिडीओ

Live Updates

Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचे सर्व अपडेट्स!

15:02 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

फलोत्पादन विभाग – ७०८ कोटी

मृद व जलसंधारण – ४२४७ कोटी

जलसंधारण – १६४५६ कोटी

मदत व पुनर्वसन – ६३८ कोटी

रोहयो विभाह – २२०५ कोटी

सहकार व पणन – ११७८ कोटी

कृषी विभाह – ९७१० कोटी

पदुम विभाग – ६३५ कोटी

15:00 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025:

अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीत ४२ टक्के वाढ करण्यात आली आहे – अजित पवार

14:59 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल – अजित पवार

14:59 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो.

छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे.

दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे – अजित पवार

14:58 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येईल – अजित पवार

14:56 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे – अजित पवार

14:55 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल – अजित पवार

14:50 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे – अजित पवार

14:50 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी सादर केली कविता

काळी माती ज्याची शान,

तिच्यात राबे विसरुनी भान !

पोशिंदा हा आहे आपला,

कृतज्ञतेने ठेवू जाण !

देऊ योजना अशा तया की

राहिल त्याचे हिरवे रान !!

शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मी आता शेती आणि शेतीसंबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदींकडे वळतो –

अजित पवारांनी सादर केली कविता

14:49 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे – अजित पवार

14:49 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यातून मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम सुरु आहे – अजित पवार

14:47 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे – अजित पवार

14:47 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे – अजित पवार

14:47 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये आहे – अजित पवार

14:45 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025:

वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वत: मान्यता. अंदाजित किंमत ८८५७४ कोटी. प्रकल्पाचे लाभक्षेत्र ३७१२७७ हेक्टर. लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला बुलढाणा या ६ जिल्ह्यांना होईल – अजित पवार

14:43 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी, मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी उपयुक्त प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या २ वर्षांत त्यासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल – अजित पवार

14:42 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

पुढील वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता

बंदरे विभागास ४८४ कोटी

सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास – १९९३६ कोटी

परिवहन विभाग – ३६१० कोटी

नगरविकास विभाग – १०६२९ कोटी

ग्रामविकास विभाग – ११४८० कोटी

पर्यावरण विभाग – २४५ कोटी

उर्जा विभाग – २१५३४ कोटी

14:40 (IST) 10 Mar 2025

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ६ हजार डिझेल बसेसचं रुपांतर सीएनजी व एलएनजीमध्ये करण्याची प्रक्रिया चालू आहे. नवीन बस खरेदीसाठीही अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल – अजित पवार

14:38 (IST) 10 Mar 2025

Arthsankalp Adhiveshan 2025:

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल – अजित पवार

14:37 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

मुंबई,. नागपूर. पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी १४३.५७ किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. याचा फायदा रोज १० लाख प्रवासी घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईत ४१.२ किमी, पुण्यात २३.२ किमी असे ६४.४ किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या ५ वर्षांत राज्यात २३७.५ किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोचा ४० किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ६७०८ कोटी किमतीच्या ४३.८० किमी लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग व पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका या प्रकल्पाला केंद्रानं मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो टप्पा २ अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी व नळस्टॉप, वारजे, माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९८९७ कोटी किमतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे – अजित पवार

14:35 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

शिवडी ते वरळी या १०५१ कोटी किमतीच्या उन्नत जोडरस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केलं जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा यादरम्यानचे १४ किमी लांबीचे १८ हजार १२० कोटी खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्याचे ५५ किमी लांबीच्या ८७ हजार ४२७ कोटी किमतीचा प्रकल्प हाती घेतला जाईल. पुणे ते शिरूर या ५४ किमी लांबीच्या ७५१५ कोटी किमतीचा उन्नत मार्गाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव ते चाकण या २५ किमी लांबीत ४ पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहेत. यासाठी ६४९९ कोटी खर्च अपेक्षित आहे – अजित पवार

14:32 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व इतर महत्त्वाची शहरं विमानतळाशी जोडली जाणार आहेत. बाळकुंभ ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून त्याचे ३३६४ कोटींचे खर्चाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन – अजित पवार

14:30 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

पवना ते पात्रादेवी हा ७६० किमी लांबीच्या ८६ हजार ३०० कोटी किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कामे प्रगतीपथावर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळादरम्याच्या मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केलं जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होईल – अजित पवार

14:27 (IST) 10 Mar 2025
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

समृद्धी महामार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण झालं असून त्यासाटी ६४ हजार ७५५ कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल – अजित पवार

14:26 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकची कामं पूर्ण झाली असून टप्पा दोन अंतर्गत ९६१० किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची कामं मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ७ हजार किमी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ३५८२ गावं १४ हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा-राज्य-राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. याची एकूण किंमत ३०१०० कोटी आहे. पहिल्या टप्प्यात ८ हजार कोटींची कामं करण्यात येणार आहेत – अजित पवार

14:25 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत ६५०० किमी लांबीची ५६७० कोटी किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी ३७८५ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षासाठी १५०० किमी लांबीच्या रस्त्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे – अजित पवार

14:23 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

अमृतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या आराखड्यात पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ, गडकिल्ले, ५ हजारांहून जास्त लोकसंख्येच्या वसाहती, सर्व जिल्हा व तालुका मुख्यालये जोडण्यासाठी रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. आशियायी विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा एक पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३ हजार ९३९ कोटी किमतीची ४६८ किमी रस्ते सुधाराची कामं हाती घेतली आहेत. त्यातली ३५० किमीची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा तीन अंतर्गत ७५५ किमी लांबीची ६५८९ कोटी किमतीची २३ कामे हाती घेण्यात आली आहेत. ६ हजार किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी ३६ हजार ९६४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे – अजित पवार

14:19 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

दिघी, वेंगुर्ला, डोंबिवली, मीरा भाईंदर, ठाणे येथील जेट्टीची कामं प्रगतीपथावर आहेत. हवामान बदल व इतर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी किनारी जिल्ह्यांत ८ हजार ४०० कोटींचा बाह्र सहाय्य प्रकल्प राबवला जाणार आहे – अजित पवार

14:18 (IST) 10 Mar 2025

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीसाठी सुसज्ज जेट्टीसाठी २२९ कोटी २७ लाख रुपये किमतीचं काम चालू आहे – अजित पवार

14:17 (IST) 10 Mar 2025
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:

गेट वे ऑफ इंडियाहून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त बोटींना आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं जाईल – अजित पवार

आर्थिक सर्वेक्षण २०२५ | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ (प्रातिनिधिक छायाचित्र)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५