Mumbai News Updates, 13 March 2023 : राज्यात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडत अनेक घोषणा केल्या. त्यानंतर आता अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होईल. विरोधकांकडून घोषणा केल्या, मात्र निधी कुठं आहे असा सवाल करण्यात आला. त्यामुळे आता याचे पडसाद सभागृहातील चर्चेतही उमटणार आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी होत असल्याचाही आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरुनही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा हा आढावा…
Marathi News Updates : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतर सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल, हा प्रकार आज एका आमदाराबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते, शीतल म्हात्रे प्रकरणी आमदार यामिनी जाधव यांचं वक्तव्य, चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी
कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अधिवेशनात घोषणा, कांदादर पडून शेतकरी अडचणीत आल्याने निर्णय
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च नाशिककडून मुंबईकडे रवाना, लाल वादळ विधिमंडळावर धडकणार, मागील वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप
माझी संपत्ती गहाण ठेऊन कारखाना चालवला, संजय राऊतांकडून अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप, आमदार राहुल कुल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले
भाजपा आमदार राहुल कुल यांनी दौंडमधील भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा भ्रष्टाचार केला, खासदार संजय राऊत यांचा आरोप, याबाबतचे सर्व पुरावे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचंही राऊतांनी सांगितलं
आपल्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींचा विमा काढण्याची ऑफर विमा कंपन्यांकडून दिली जाते. आपणही आरोग्य, टर्म लाईफ, गाडीचा विमा, घराचा विमा, गृहकर्जाचा विमा असे अनेक प्रकारचे विमा काढतो आणि त्याचे हफ्ते भरत असतो. याचा उद्देश एकच असतो तो म्हणजे या कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला, तर त्यासाठी आर्थिकदृष्ट्या आधार मिळावा! मात्र, अशा प्रसंगी काही विमा कंपन्यांकडून ग्राहकांची अडवणूक होत असल्याचीही अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं एका विमा कंपनीला फटकारलं असून पीडित कुटुंबाला तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांनंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदे घेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं. या घोटाळ्याची कागदपत्रे सोमय्यांकडे चार वेळा पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईकांना पदावरून हटवलं आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने, त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.