Today’s News Updates: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावरून अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सर्वपक्षीय गटांमध्ये कुठून कुणाला उमेदवारी मिळणार? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर!

19:14 (IST) 29 Feb 2024
नितीन गडकरींनी आश्वासन पाळले नाही म्हणून नागपुरात निदर्शने….

नागपूर : जय विदर्भ पार्टीने आज व्हेरायटी चौक, नागपूर येथे “वादा निभाओ – विदर्भ राज्य बनाओ” अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आंदोलक म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यास १०० दिवसात विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करू असे लेखी आश्वासन दिले होते.

सविस्तर वाचा...

18:37 (IST) 29 Feb 2024
निवडणूक आचारसंहिता काळात धर्माच्या मुद्यावर प्रचार झाल्यास कारवाई, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्या काळात कोणत्याही धर्माच्या मुद्यावर प्रचार करून मतदारांना आकृष्ट करता येणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल.

सविस्तर वाचा...

18:04 (IST) 29 Feb 2024
आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल

बुलढाणा : वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या विधानावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 29 Feb 2024
Maharashtra Budget Session 2024 Live: विधानसभेचं आजचं कामकाज संपलं...

विधानसभेचं आजचं कामकाज संपलं असून उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा कामकाज सुरू होईल.

17:38 (IST) 29 Feb 2024
VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….

बुलढाणा: चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदिरात अस्वलाच्या कुटुंबाने स्वच्छंद भटकंती केली. याची चित्रफीत समाज माध्यमावर वेगाने सामायिक होत आहे.

सविस्तर वाचा...

17:30 (IST) 29 Feb 2024
Maharashtra Live News Today: नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं...

लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे - नारायण राणे</p>

https://twitter.com/MeNarayanRane/status/1763121492152218031

17:24 (IST) 29 Feb 2024
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित

मुंबई : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 29 Feb 2024
रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही

पनवेल : सातबारावरील साधी नोंद १ महिन्यापेक्षा जास्त आणि विवादग्रस्त तक्रार नोंद ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेऊ नये याबाबत वारंवार सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी केलेल्या चालढकलपणामुळे रायगड उपजिल्हाधिकारी संदीप शिर्के यांनी शिस्त लागण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची एका आठवड्यांची सेवा यापुढे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात वर्ग करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 29 Feb 2024
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

नाशिक – घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर घरफोडी करणाऱ्या १० जणांच्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 29 Feb 2024
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार

अडीच मिनिट एक इसम एका दृश्य ध्वनी चित्रफितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी नावाने उल्लेख करून त्यांच्या जातीचा उल्लेख करत आहे.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 29 Feb 2024
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत

श्री अंबाबाई मंदिर येथील जोतिबा रोड येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 29 Feb 2024
“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे काँग्रेसमधील परिवारवादचे राजकारण करणारे काही लोक बेरोजगार झाले आहे, अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर केली आहे.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 29 Feb 2024
नंदुरबार : एका आरोग्य केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पाठवणी, बंद रुग्णवाहिकेतच प्रसुती, अन…

नंदुरबार – आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील असुविधांमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महिलेस जीव गमवावा लागला. मागील आठवड्यातील ही घटना उजेडात आली असून नादुरुस्त रुग्णवाहिकेतच प्रसुती झालेल्या या महिलेच्या मृत्यूने पुन्हा एकदा आदिवासी भागातील समस्या पुढे आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 29 Feb 2024
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…

नागपूर : शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल म्हणून कस्तूरचंद पार्क मैदानाजवळील पुलाची गणना होते. या उड्डाणपुलामुळे शहराबाहेर जाण्याचा मार्ग जरी सोपा झाला असला तरी पुलाचे नियोजन चुकले आहे.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 29 Feb 2024
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा

सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी असल्याने दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 29 Feb 2024
राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून,१६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा

14:59 (IST) 29 Feb 2024
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण

नाशिक – कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याच्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 29 Feb 2024
देवेंद्र फडणवीस का म्हणाले, मी पुन्हा येईन…

पुणे : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहीले. मात्र व्हिडिओ द्वारे त्यांनी केलेल्या 'मी पुन्हा येईन' या  विधानाची चर्चा कार्यक्रमात रंगली.

सविस्तर वाचा

14:44 (IST) 29 Feb 2024
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार

पनवेल: १० वर्षांपासून पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागविणा-या पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अंतर्गत दुरुस्तीचे काम पनवेल पालिकेने हाती घेतले असून त्यासाठी ५५ लाख रुपये खर्च पालिका प्रशासन कऱणार आहे.

सविस्तर वाचा

14:43 (IST) 29 Feb 2024
पनवेल: शेअर ट्रेडींगच्या नावाखाली दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटींचा गंडा

पनवेल ः महिन्याभरातून नवी मुंबईतून १५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणा-या टोळीने अजून दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटी रुपयांना फसवले आहे. यामध्ये फसगत झालेले एका ४३ वर्षीय डॉक्टर तर दूस-या व्यवस्थापनात मास्टर पदवी मिळविलेल्या एका गृहिणीचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

14:43 (IST) 29 Feb 2024
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे

यवतमाळ: यवतमाळकरांची गेल्या १५ वर्षांची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपली. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किमी रेल्वेमार्गावरील कळंब ते वर्धा या पहिल्या टप्याळततील रेल्वेसेवेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाले आणि यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

सविस्तर वाचा

14:37 (IST) 29 Feb 2024
Maharashtra Live News Today: रोहित पवारांचा अजित पवारांना टोला!

जर पंकजा मुंडेंना खासदारकीची उमेदवारी दिली गेली, तर प्रीतम मुंडे आमदारकीला उभ्या राहणार आहेत का? त्या तिथून दोनदा खासदार झाल्या आहेत. अशात त्यांना डावलून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली, तर प्रीतम मुंडे काय भूमिका घेणार हे बघावं लागेल. धनंजय मुंडेंचा मतदारसंघ येत्या काळात सुरक्षित व्हावा हे स्वहित मनात ठेवून ते बहिणीला मदत करत असतील. पण एखादा भाऊ बहिणीला निवडणुकीसाठी मदत करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण या महाराष्ट्रात एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी मदत करतोय. दुसरीकडे भाऊ विरुद्ध बहीण ही अप्रत्यक्ष लढतही सगळ्यांना बघायला मिळणार आहे - रोहित पवार

14:27 (IST) 29 Feb 2024
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश

मुंबई : दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली. तसेच, वाहतुकीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे वाहतूक समस्या निर्माण होण्यासह त्वेषाने वाहन (रोड रेज) चालवण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची टिप्पणी करून न्यायालयाने त्याबाबत चिंता व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 29 Feb 2024
वर्धा : गावठी दारू फॅक्टरी; ‘किक’ येण्यासाठी युरिया अन…

वर्धा : दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जीवावर बेतणारे ठरू शकते, असे उघडकीस आले आहे. अस्सल मोहाफूलची दारू किक देत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने झटकेबाज दारू करणारी फॅक्टरीच उजेडात आली.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 29 Feb 2024
चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ५१ टक्‍के पाणीसाठा

अमरावती : यंदा पुरेसा पाऊस होऊनही फेब्रुवारीअखेर अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावला आहे.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 29 Feb 2024
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला

भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा...

13:26 (IST) 29 Feb 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले आहेत.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 29 Feb 2024
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?

अकोला : अकोला ऑईल इंडस्ट्रिज लि. बिर्लाच्या जमिनीवरून बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी भाजपचे आमदार रणधीर सावरकर व शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी इंटक नेते प्रदीप वखारिया यांच्यावर दाखल केलेला प्रत्येकी ५० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने खर्चासह फेटाळला आहे.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 29 Feb 2024
निवडणूक कामे करा, अन्यथा फौजदारी कारवाई; सरकार-निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात धर्मादाय आयुक्त उच्च न्यायालयात

मुंबई : धर्मादाय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावण्यात आली आहेत. तसेच, ही कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्याविरोधात धर्मादाय आयुक्तांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून सुनावणी शुक्रवारी घेण्याचे स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

12:50 (IST) 29 Feb 2024
Maharashtra Budget Session 2024 Live: राज्याची महसूली तूट म्हणजे बाटाच्या बुटाची किंमत - जयंत पाटील

राज्याची महसूली तूट ९९ हजार २८८ कोटी आहे. म्हणजे ती एक लाख कोटींच्या वरच असते. पण थोडाफार जुगाड करून यात दुरुस्ती केलेली दिसतेय. आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत असते ९९९ रुपये. तसा हा महसुली तुटीचा आकडा दाखवला आहे. मला प्रश्न पडतो की बाटाचा बूट ९० रुपयांना का नाही? तो ९९ रुपयांनाच का असतो? कारण माणसाला बरं वाटतं की १०० रुपये नसून ९९ रुपये किंमत आहे. तसा हा आकडा आहे - जयंत पाटील</p>

Mumbai Maharashtra News Live in Marathi

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह

Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!