Today’s News Updates: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावरून अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सर्वपक्षीय गटांमध्ये कुठून कुणाला उमेदवारी मिळणार? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर!
नागपूर : “आर्ची’ ने पहिल्याच चित्रपटातून तिचा प्रेक्षकवर्ग तयार केला. ती “सैराट” चित्रपटातील “आर्ची” होती. या “आर्ची” ने सुद्धा अल्पावधीतच तिची “फॅनफालोइंग” तयार केली आहे, पण ही “आर्ची” “सैराट” चित्रपटातली नाही. तर ती यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील “आर्ची” नावाची वाघीण आहे.
नाशिक – तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची तक्रार करत नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसच्या वाहकांनी पुन्हा एकदा काम बंदचे हत्यार उपसल्याने गुरुवारी बससेवा ठप्प झाली. परीक्षा काळात बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटी ८१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ गुन्ह्यांची नोंद केली, तसेच ४११ आरोपींना अटक केली.
मुंबई : चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपल्याला अपमानित केले, मात्र सूड उगवण्याचा आपला स्वभाव नाही. तसेच, आपल्याला अपमानित करणाऱ्यांविरुद्ध दावे दाखल करण्यापेक्षा आपला बचाव करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले, असा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयात केला.
नागपूर : शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यात होणारा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पॅरावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये परिचर्या अभ्यासक्रम महाविद्यालय (बीएससी नर्सिंग) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी ऐकवून उपदेशाचे डोस पाजले. पण अजित पवारांनी काही ओळी मुद्दाम सोडल्या. कुसुमाग्रजांनी त्या कवितेत म्हटलंय…
जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
या ओळी अजित पवारांनी मुद्दाम गाळल्या.
सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.
पिंपरी : महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी असून त्यावर वर्षाला ५६ कोटींचे व्याज मिळत आहे. या ठेवी राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदा या बँकेत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या एका परिपत्रकाचा आधार घेत आणि ज्यादा व्याज मिळावे, यासाठी पालिका आता खासगी बँकांमध्ये ठेवी ठेवणार आहे. दरम्यान, २०२० मध्ये येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यामुळे पालिकेचे ९८४ कोटी रुपये अडकले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठ प्रशासनाने नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी तात्पुरती मतदारयादी जाहीर केली असून एकूण नोंदणीपैकी ५० टक्के पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तात्पुरत्या मतदारयादीनुसार १३ हजार ३९४ पदवीधरांचे मतदार अर्ज पात्र, तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १३ हजार ३५० पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे सात तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरल्याची घटना घडली. पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा माग काढला. रिक्षात विसरलेले दागिने महिलेला परत मिळवून दिले.
पिंपरी : वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली
कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात काल रात्री ऑर्केस्ट्रा सुरू असताना दोन गटांत जोरदार वाद झाला. यातून परस्परांमध्ये बेदम मारहाण झाली.
जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
ठाणे पोलिसांनी बुरहानपुर पोलिसांना याबाबत पत्र व्यवहार करून तेथे तयार केले जाणाऱ्या अग्निशस्त्रांच्या कारखान्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.
मोदी खोटं बोलतात. पंतप्रधानांनी खोटं बोलू नये. पंतप्रधानांनी आपली आधीची विधानं आठवायला हवीत. ते म्हणाले होते की शरद पवार या देशाचे उत्तम कृषीमंत्री होते. यूपीए सरकारमध्ये नरेंद्र मोदींबाबत वेगळी भूमिका घेतली गेली होती, तेव्हा कृषीमंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी-सहकाराबाबत आवर्जून मदत करत होते. हे नरेंद्र मोदींनी वारंवार जाहीरपणे सांगितलं आहे. एखाद्या गावात निवडणुकीबाबत त्यांना खोटं बोलायचं असेल, तर ते बोलू शकतात. मोदींनी हेही सांगितलं होतं की शरद पवारांचा हात धरून मी राजकारणात आलो. त्यांनी हेही सांगितलं होतं की महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आदर्श घोटाळा होता. त्याच घोटाळ्याच्या सूत्रधाराला मोदींनी राज्यसभा उमेदवारी दिली. सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांना त्यांनी आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे मोदींच्या विधानांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता महाराष्ट्रात व देशात नाही. ते खोटं बोलतात – संजय राऊत
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "The new parliament is like a five-star jail where you can't work. When we form our govt we will start our parliament session in our historical parliament (old parliament). PM Modi should set a target of 600 instead of 400… pic.twitter.com/l2FouO9qGc
— ANI (@ANI) February 29, 2024
Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!