Maharashtra Budget Session 2024 Updates, 26 February : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू होत आहे. शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, आता ते पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Budget Session 2024 Live Updates :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

11:20 (IST) 26 Feb 2024
अनैतिक संबंधातून विनय पुणेकरचा खून; प्रेयसी साक्षी गोव्हरला अटक, प्रियकर फरार

नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडाला वेगळेच वळण लागले असून या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी साक्षी गोव्हर (३२, रा. मानकापूर) हिला अटक केली असून गोळी झाडणारा तिचा नवा प्रियकर शुक्ला अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी एक पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.

वाचा सविस्तर…

11:07 (IST) 26 Feb 2024
बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे आज लोकार्पण

बदलापूर: पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण सोमवारी होते आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र होम प्लॅटफॉर्मवर सोमवारीही प्रवासी उन्हातच लोकल पकडण्यासाठी उभे असल्याचे चित्र होते.

वाचा सविस्तर…

11:04 (IST) 26 Feb 2024
मोठी बातमी : शिक्षक भरती प्रक्रियेत झाली उमेदवारांची शिफारस

राज्यात २१ हजार पदांसाठीची शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत आता पुढचे पाऊल पडले असून, मुलाखतीविना नियुक्तीअंतर्गत शिक्षण विभागातर्फे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 26 Feb 2024
पुणे : जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार

जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 26 Feb 2024
पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पाषाण-सूस रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 26 Feb 2024
मार्डचा संप मागे

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर मार्डने त्यांचा राज्यव्यापी संप मागे घेतला.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 26 Feb 2024
आता विकासकावर झोपु योजनेतील इमारतीची दहा वर्षे जबाबदारी, गोरेगाव आगीच्या पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाचा निर्णय

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतींचा ताबा दिल्यानंतर पुढील दहा वर्षांसाठी इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता विकासकाची असणार आहे.

सविस्तर वाचा…

10:58 (IST) 26 Feb 2024
मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यात एसटी बस पेटवली; राज्यभर निदर्शने

अंबड तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत.

10:49 (IST) 26 Feb 2024
“जरांगे पाटील ग्रामीण भागातील, त्यांची भाषा…”, संजय राऊतांचं विधान

जरांगे पाटील साधे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देऊ नका. ते काही व्हाईट कॉलर नेते नाहीत. भाजपामधील कडक इस्रीचे नेत्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. एकमेकांना संपवण्याची भाषा आहे. खतम करण्याची भाषा आहे. ही भाजपाची भाषा या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील एका टोळीने बिघडवली आहे. नाहीतर हा महाराष्ट्र सलोख्याने वागणारा सुसंस्कृत वागणारा महाराष्ट्र आहे – संजय राऊत</p>

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह