Maharashtra Budget Session 2024 , 01 March 2024 : सध्या देश तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयीच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. राज्य सरकारच्या बारामतीतील रोजगार मेळाव्याला खासदार शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर टीका केली जात आहे. दुसरीकडे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून विधिमंडळात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. या घडामोडींसह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर
Mumbai Maharashtra News Updates : महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
बुलढाणा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पीडितेच्या मैत्रीणीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाशिम : एका खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा तहसील कार्यालय परिसरात १ मार्च रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान घडली.
नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी समाज माध्यमावर शेअर केलेला नागपूरच्या अतरंगी डॉलीच्या हातच्या चहा पिण्याचा व्हिडिओ सध्या जगभरात गाजत आहे. समाजमाध्यमावर ‘डॉली की टपरी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या डॉलीच्या चहाकडे इतका मोठा उद्योगपती कसा आकर्षित झाला हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पिंपरी : समाजमाध्यमातील इन्स्ट्राग्रामवर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म संबंधित चित्रफितीचा वापर करुन वेगवेगळे ट्रेडिंग वापरून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपळेसौदागर येथे उघडकीस आला.
नागपूर : एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेत उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस बढती परीक्षा सराव शिबीर घेणार आहे.
पुणे : के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्काॅन मंदिर येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या बुधवारी (६ मार्च) करण्यात येणार आहे. त्यामुळे के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, राजीव गांधीनगर, अप्पर आणि सुप्पर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक, कात्रज आणि कोंढवा यासह दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
सांगली : प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूसह गुटखा वाहतूक करत असताना वाहन ताब्यात घेऊन सुमारे अडीच लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. हा गुटखा कोठून आणण्यात आला व कोणाला पुरवठा केला जाणार होता याची माहिती पोलीस घेत आहेत.
सांगली : कर्मचार्यांबाबत तक्रारी केल्याच्या कारणावरून ग्रामसेवकालाच बेदम मारहाण करण्याचा प्रकार नागेवाडी (ता. खानापूर) या गावी मासिक सभेवेळी बुधवारी घडला. या प्रकरणी ग्रामसेवक महादेव इंगवले यांनी कर्मचारी विजय निकम याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण करत शिवीगाळ केली म्हणून तक्रार दाखल केली आहे.
यवतमाळ : पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील गोदणी मार्गावर असलेल्या ऑक्सीजन पार्क परिसरात गुरुवारी सकाळी घडली.
कोलशेत भागात उभारण्यात आलेल्या ‘नमो सेंट्रल पार्क’मध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरातील रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासह अन्य काही सोयी सुविधा आहेत काय, याची पाहणी केली.
पुणे : बारामती येथे होणाऱ्या ‘नमो महा रोजगार मेळाव्या’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून वाद सुरू झाला असतानाच जिल्हा प्रशासनाकडून पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मेळाव्याची सुधारित निमंत्रणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागपूर : शहराच्या दोन भागांना परस्परांशी जोडणारा दुवा अशी बर्डीवरील लोखंडी पुलाची ओळख आहे. त्याखालून जाणाऱ्या वाहनांची संख्या व त्यामुळे होणारी वाहन कोंडी लक्षात घेऊन मानस चौकात नवीन भुयारी मार्ग (आरयूबी) तयार करण्यात आला. परंतु, त्याचे नियोजन चुकल्यामुळे हा चौक मोठ्या वाहनांसाठी अडचणीचा ठरत आहे.
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आल्यानंतर फायदा होईल काय, याचे गणित आपण केलेले नाही. हा आपल्या पातळीवरचा मुद्दा नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.
खासदार शरद पवार यांनी दिलेलं भोजनांच आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाकारलं आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री भोजनास येऊ शकत नाहीत, असं मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसं पत्रदेखील शरद पवार यांना पाठवण्यात आलंय.
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय) हे केवळ लोकांच्या वैयक्तिकच नव्हे, तर व्यावसायिक आयुष्यातही महत्वाची भूमिका बजावत आहे. व्यवसाय वाढीसाठी मजकूर निर्मिती करणे, सर्जनशील कल्पना, बोधचिन्ह तयार करणे, विपणन क्लृप्त्या, तसेच भाषांतरासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान हे परिपूर्ण नाही, परंतु तरीही दैनंदिन जीवनात त्याचा मोठा वापर होत आहे, असे मत मेटा इन इंडियाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांनी गुरुवारी व्यक्त केले.
मुंबई : राज्यातील परमीट रुम व बारमध्ये ग्राहकांना भेसळयुक्त मद्य दिले जाते का, याचा आता शोध घेणे उत्पादन शुल्क विभागाला लवकरच शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आतापर्यंत फक्त मद्य उत्पादकांकडे होती. ही यंत्रणा आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून खरेदी केली जाणार आहे.
मुंबईः महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात गुन्ह्यातून कमावलेले सुमारे ५८० कोटी रुपये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोठवले. ईडीने याप्रकरणी नुकतीच कोलकाता, गुरुग्राम, दिल्ली, इंदूर, मुंबई आणि रायपूर येथील महादेव ऑनलाइन बुकशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी या ५८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली होती. या कारवाईत एक कोटी ८६ कोटी रुपये रोख, एक कोटी ७८ लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
मुंबई : काँग्रेसच्या तीन माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अमरावती : कापसाचा हंगाम संपलेला असताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर नाहीच. उलट कमी दरात कापसाची विक्री करावी लागली. आता कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.
नवी मुंबई : साखर खरेदी प्रकरणी कोलकाता येथील व्यापाऱ्याची नवी मुंबईतील तिघांनी तब्बल ६० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
गडचिरोली : भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. आज, शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या कामाविषयी काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
नागपूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करणारे भाजपचे कार्यकर्ते होते, मराठा समाज हा जरांगे यांच्या पाठीशी आहे, असे सकल मराठा समाजाचे प्रकाश खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूर : राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या गुरुवारी दुपारी अचानक संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या. त्यांनी जवळपास अर्धा तास तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
भंडारा : भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी भाजपकडून लोकसभा निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गाव हद्दीत गुटखा उत्पादनाचा कारखाना आढळून आला.
पाच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास स्वतंत्र जागा तसेच शासकीय इमारत उपलब्ध नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा पिपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे.
बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई : चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी आरोपी असलेल्या जोगिंदर राणा याच्या नालासोपारा येथे २०१८ मध्ये झालेल्या कथित बनावट चकमकीच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासावर उच्च न्यायालयाने गुरूवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा इशारा दिला.
जोगिंदर यााचा भाऊ सुरेंद्र राणा याने वकील दत्ता माने यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त इशारा दिला. नालासोपारा येथील स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस नाईक मनोज सकपाळ आणि पोलीस हवालदार मंगेश चव्हाण यांनी बनावट चकमक घडवून आणल्याचा याचिकाकर्त्याने आरोप केला होता. तसेच, या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची आणि प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी याचिकेत करण्यात आला होती. न्यायालयाने प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, खुनाचा गुन्हा दाखल असून कथित आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न खंडपीठाने तपास यंत्रणेला केला. तसेच, प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवताना गुन्हा दाखल केल्यापासून तपासाच्या प्रगतीची नोंद असलेली नोंदवही न्यायालयात सादर करण्याचे आदेश एसआयटीला दिले. त्याचवेळी, तपास यंत्रणेला स्वत:च्या पोलिसांवर कारवाई करायची नसल्यास प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला.