Maharashtra Budget Session 2024 , 01 March 2024 : सध्या देश तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयीच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. राज्य सरकारच्या बारामतीतील रोजगार मेळाव्याला खासदार शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर टीका केली जात आहे. दुसरीकडे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून विधिमंडळात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. या घडामोडींसह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Updates : महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
मुंबई : बदनामी करण्याची धमकी देऊन पाच महिन्यांमध्ये १२ वर्षांच्या मुलीकडून एक लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी २० वर्षीय तरूणाविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) व खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार व्यावसायिकाच्या घरातून अचानक रक्कम गायब होऊ लागली होती. त्यामुळे व्यावसायिकाने लक्ष ठेवले असता मुलगी घरातून पैसे नेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता २० वर्षीय आरोपीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सर्वांना सांगून माझी बदनामी करण्याची धमकी दिली होती. तसे न करण्यासाठी वारंवार तो पैशांची मागणी करीत असल्याचे पीडित मुलीने सांगितले.
सुदैवाने या खाटेवर रुग्ण नव्हता मात्र शेजारच्या खाटेवरील महिला थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते यांच्यावर काँग्रेसचा असलेला राग वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेगळीच निषेधाची कृती केली. ती आता चांगलीच चर्चेत आहे.
वर्धा : हिंदू धर्मात यशोदा जयंतीला खूप महत्त्व आहे.पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीला यशोदा जयंती साजरी केली जाते. यशोदा जयंती उत्तर भारतीय चंद्र दिनदर्शिकेनुसार दरवर्षी कृष्ण पक्ष षष्ठी तिथीला फाल्गुन महिन्यात साजरी केली जाते.
धरणातून बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा होणार नाही.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर आता पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे.
पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मार्गाचे उद्घाटन ६ मार्चला होण्याची शक्यता आहे.
मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर – इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा २५ किमी लांबीचा टप्पा सोमवार, ४ मार्च रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. वाघेरे यांनी प्रचार देखील सुरू केला आहे.
नागपूर : सरोगसी कायदा २०२१ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली.
नवी मुंबई : नवी मुंबईचा राणीचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गालगत लाखो फ्लेमिंगोचा अधिवास येथील पाणथळ जागेवर पाहायला मिळतो. त्यामुळे नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा गाजावजा करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने याच फ्लेमिंगोचे घर उद्धवस्त करण्याचा डाव आखला आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जननालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळ असलेल्या विद्यापीठाच्या मोकळ्या मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’चे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत पाम बीच मार्गावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याच्या निर्णयावर शहरातील पर्यावरण प्रेमींकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना मार्केट यार्डमधील भुसार बाजारात घडली.
राज्य सरकारने मेट्रो स्थानकाच्या नावात बदल करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोला स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर होत नसल्याचे चित्र आहे.
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या लांबीकरणाऐवजी रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता.
किरकोळ वादातून शाळकरी मुलावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह दाेन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने रस्ते निसरडे झाल्याने दुचाकीस्वार घसरल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आल्या.
लोकसभेच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जागेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कारण या जागेवर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेनंतर सत्ताधारी तसेच विरोधी बाकावरील नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. दरम्यान, कोल्हापूरच्या याच जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यांच्या या भाष्यानंतर शाहू महाराज लोकसभेची ही निवडणूक लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातेय. वाचा सविस्तर
आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी याच लोकसभा निवडणूक आणि भाजपाची रणनीती महत्त्वाचं विधान केलंय. भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हानच प्रकाश आंबेडकरांनी दिलं. वाचा सविस्तर