Maharashtra News Updates, 15 March 2023: महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल. दुसरीकडे राज्याचया अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. तर हे सगळं घडत असताना राज्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्ये पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालय व्यवस्थापनाकडून कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे.

Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:44 (IST) 15 Mar 2023
“राज्यपाल Whip बाबत का बोलतायत? हा विषय तर…”, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात परखड युक्तिवाद; ‘या’ नियमाचा दिला दाखला!

कपिस सिब्बल म्हणतात, “एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचं पत्र शिवसेनेनं अध्यक्षांना दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारलंही होतं. मग राज्यपालांनी कोणत्या कायद्यानुसार…!”

वाचा सविस्तर

16:03 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: आजची सुनावणी संपली..

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली असून उद्या सकाळी पुन्हा कपिल सिब्बल आपला युक्तिवाद चालू ठेवणार आहेत.

15:59 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: त्यांना राज्यपालांनी सांगायला हवं होतं की… – सिब्बल

जर तुम्ही गट असाल किंवा पक्ष असाल तर राज्यपालांनी त्यांना सांगायला हवं होतं की मी तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही. यावर आधी निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायला हवा होता. त्याआधी अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा होता – कपिल सिब्बल

15:55 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपाल व्हीपबाबत का बोलतायत? – सिब्बल

सुरुवातीपासूनच ही सगळी प्रक्रिया राजकीय राहिली आहे. राजकीय पक्षाकडून प्रतोदची नियुक्ती केली. पण राज्यपाल प्रतोदविषयी का बोलतायत? त्यांचा प्रतोदशी काय संबंध? हा सभागृहाचा विषय आहे. अजय गोगावलेंची नियुक्ती अवैध आहे असं ते म्हणतायत. त्यांचा असं बोलण्याचा काय संबंध? – कपिल सिब्बल

15:46 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: कोणत्याच कागदपत्रामध्ये त्यांनी ते शिवसेना असल्याचा कुठेही उल्लेख नाही – सिब्बल

२१ जूनपासून त्यांनी १९ जुलैपर्यंत केलेल्या कोणत्याच कागदपत्रामध्ये त्यांनी ते शिवसेना असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ही न्यायव्यवस्थेची, राज्यघटनेची मस्करी चालवली आहे. हे फक्त महाराष्ट्राविषयी नाही, इतर कुठल्याही राज्याविषयी घडू शकतं. जर हे घडू दिलं, तर हेच आपलं भविष्य आहे – सिब्बल

15:44 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: आयाराम-गयाराम संस्कृती पुन्हा येतेय – सिब्बल

शिंदे गट शिवसेना पक्ष नाही, ते गट आहेत. त्यांना कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? असं करून आपण पुन्हा आयाराम-गयाराम संस्कृती आणतोय. असं करून सरकार पाडायचं आणि त्यानंतर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही – सिब्बल

15:42 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सर्व निकाल हे संदर्भानुसार ठरत असतात – सिब्बल

सर्व निकाल हे संदर्भानुसार ठरत असतात. शिवराज चौहान प्रकरणात २२ राजीनामे आणि त्यातले ६ स्वीकारले हा संदर्भ होता – कपिल सिब्बल

15:39 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ..मग त्यांना आयोगाकडे जायची गरजच नव्हती – कपिल सिब्बल

त्यांचं म्हणणं आहे की पक्षात फूट नाही, पक्षांतर्गत दोन गट आहेत. पण निवडणूक आयोगासमोर ते म्हणाले की आम्ही पक्षातून फुटून निघालेलो गट आहोत. कारण जर ते पक्ष आहेत, तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरजच नव्हती – कपिल सिब्बल

15:37 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? – सिब्बल

घटनेच्या कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. ४ जुलैपर्यंत कुणीही त्या निर्णयावर आक्षेप घेतला नव्हता किंवा तो बदलला नव्हता. मग शिंदे गट असा दावा कसा करू शकेल की आम्ही शिवसेना आहोत? आम्ही शिवसेना आहोत म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही शिवसेना आहोत – सिब्बल

15:35 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी कोणत्या अधिकाराखाली एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं?

३ जुलैला सुनील प्रभूंनी भाजपा उमेदवाराला मतदान न करण्याचा व्हीप बजावला. पण त्याचं उल्लंघन केलं गेलं. एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचं पत्र अध्यक्षांना दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारलंही होतं. मग राज्यपालांनी कोणत्या अधिकाराखाली एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं? – कपिल सिब्बल

15:32 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्षच प्रतोदची नियुक्ती करत असतात – कपिल सिब्बल

शिंदे गट किंवा राज्यपालांकडून कुणीच प्रतोदच्या मुद्द्यावर भूमिका मांडली नाही. ते म्हणतात विधिमंडळ गटनेते प्रतोदची नियुक्ती करतात. पण राजकीय पक्ष आणि पक्षप्रमुख प्रतोदची नियुक्ती करत असतात – कपिल सिब्बल

15:27 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सभागृहातल्या आकड्यांमुळे सरकार पडत नाही, आघाड्यांमुळे पडतं – सिब्बल

सभागृहातील आकडे सरकार पाडत नाहीत, राजकीय पक्षांच्या आघाड्या सरकार बनवतात किंवा पाडतात. त्यामुळेच राज्यपालांच्या निर्णयामुळे काय घडतं ते बघा – कपिल सिब्बल

15:26 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपाल पक्षव्यतिरिक्त कुणालाच मान्यता देऊ शकत नाही – सिब्बल

बहुमत राजकीय पक्षालाच असतं. निवडणूकपूर्व आघाड्या राजकीय पक्षांच्या होतात. निवडणुकीनंतरच्या आघाड्याही राजकीय पक्षांच्याच असतात. निवडणुकीनंतरच्या युत्याही राजकीय पक्षांच्याच असतात. राज्यपाल राजकीय पक्षाव्यतिरिक्त कुणालाही मान्यता देऊ शकत नाही – कपिल सिब्बल

15:23 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: लोकशाही चौकटीतील आकडे महत्त्वाचे – सिब्बल

कोणत्याही लोकप्रतिनिधीची एकमेव ओळख सभागृहाला सांगितली जाते, ती म्हणजे तो अमुक एका पक्षाचा सदस्य आहे. त्याव्यतिरिक्त कोणतीही ओळख असत नाही. २०-३०-४० सदस्यांना त्याव्यतिरिक्त कोणतीही ओळख असू शकत नाही. गोव्यातल्या एका छोट्या पक्षाला ५ सदस्य आहेत. त्यातले दोन राज्यपालांकडे गेले आणि म्हणाले आमचा सरकारला पाठिंबा नाही. मग राज्यपाल बहुमत चाचणी घेणार का? इथे पुन्हा आयाराम-गयाराम चालू झालं. लोकशाही फक्त आकड्यांवर अवलंबून नसते. लोकशाही चौकटीतल्या आकड्यांवर अवलंबून असते – कपिल सिब्बल

15:18 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: तुषार मेहतांचा युक्तिवाद संपला!

राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर सादर करण्यास सुरुवात केली.

15:15 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे विधिमंडळ पक्षाचे सदस्य नाहीत – मेहता

राज्यपाल फक्त विधिमंडळ नेत्यांबाबतच बोलू शकतात, पण उद्धव ठाकरे तर विधिमंडळ पक्षाचे सदस्यही नाहीत – तुषार मेहता

15:13 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं – मेहता

राज्यपालांना फक्त विधिमंडळ गटनेतेच माहिती असतात. त्यांचं राजकीय पक्षाशी देणं-घेणं नसतं. त्यामुळेच राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं, राजकीय पक्षाला किंवा पक्षाध्यक्षांना बोलवलं नाही. – तुषार मेहता

15:10 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: अधिवेशन चालू असतानाच अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो – मेहता

सभागृहाचं कामकाज चालू असतानाच अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. अशा ठरावाची लेखी माहिती द्यावी लागते. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना आठवड्याभराची मुदत असते – तुषार मेहता

15:06 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ..तर थेट एकनाथ शिंदेंना शपथविधीसाठी बोलवलं असतं – मेहता

राज्यपालांनी फुटीला कोणतीही मान्यता दिली नाही. जर त्यांनी तसं काही केलं असतं, तर त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट शपथविधीसाठी बोलवलं असतं – तुषार मेहता

15:03 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ४७ आमदारांनी पाठिंबा काढला हे महत्त्वाचं होतं – तुषार मेहता

४७ आमदारांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं होतं. त्याव्यतिरिक्त कोणताही मुद्दा बहुमत चाचणीसाठी महत्त्वाचा ठरला नाही – तुषार मेहता

15:00 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: तुषार मेहतांनी अपवादात्मक स्थितीचा केला उल्लेख

फक्त अपवादात्मक परिस्थिती बहुमत चाचणीव्यतिरिक्त दुसरा एखादा मार्ग निवडला जाऊ शकतो. पण बहुतेक वेळा बहुमत चाचणी हाच एकमेव मार्ग असतो – तुषार मेहता

14:58 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला झुकतं माप दिलं नाही – मेहता

बहुमत चाचणीसंदर्ऊात निर्देश देताना राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला झुकतं माप दिलेलं नाही. ते महत्त्वाचं होतं – तुषार मेहता

14:51 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांसाठी बहुमत महत्त्वाचं – तुषार मेहता

राज्यपालांना फक्त बहुमत मिळवून चालत नाही, तर ते त्यांच्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्याकडे बहुमत राहायला हवं. लोकशाही प्रक्रियेत काम करण्यासाठी हे आवश्यक आहे – तुषार मेहता

14:43 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: शिवराज सिंह खटल्याचा दाखला…

तुषार मेहतांनी युक्तिवादादरम्यान मध्य प्रदेशातील शिवराज सिंह खटल्याचा दाखला दिला…

14:38 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: .. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले – मेहता

२२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामे सादर केले होते. या सदस्यांनी राज्यपालांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यापैकी ६ कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले होते. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याचं राज्यपालांचं मत झालं. त्यावर त्यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले – तुषार मेहता

14:29 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमत चाचणीवरून युक्तिवाद

जे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाहीत, ते राज्यपालांना विचारत आहेत की तुम्ही बहुमत चाचणीचे आदेश का दिले? – राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद

14:26 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: सरकारला पाठिंबा नसल्याचं आमदारांनी सांगितलं – मेहता

आमदार राज्यपालांना सांगत होते की आमचा सरकारवर विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांकडे बहुमताचा पाठिंबा नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले जावेत – तुषार मेहता

14:24 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: न्यायालयाच्या प्रश्नांवर तुषार मेहतांची उत्तरं…

पुराव्यांवरून हे दिसतंय की त्यांना सरकारला पाठिंबा द्यायचा नाहीये. त्यामुळेच त्यांना सुरक्षा हवी आहे – तुषार मेहता

14:20 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: विधिमंडळ गटानं सरकारचा पाठिंबा काढला आहे, पक्षाचा नाही – मेहता

विधिमंडळ गटानं त्यांच्या पक्षावर अविश्वास दाखवलेला नाही. विधिमंडळ गटानं सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामध्ये फरक आहे – तुषार मेहता

14:19 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: लंचब्रेकनंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात

लंचब्रेकनंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)