Maharashtra News Updates, 15 March 2023: महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल. दुसरीकडे राज्याचया अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. तर हे सगळं घडत असताना राज्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्ये पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालय व्यवस्थापनाकडून कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे.

Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

13:54 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले कडक शब्दांत ताशेरे; म्हणाले, “तीन वर्षांचा सुखी संसार…”

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता. तर आज राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीशांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या काही निर्णयावरून कडक शब्दात ताशेरे ओढले. सविस्तर वाचा

13:36 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: “…मग बहुमत चाचणीचा प्रश्न येतोच कुठे?” सरन्यायाधीशांचा राज्यपालांना सवाल; दिला ‘या’ नियमाचा दाखला!

“कायदेशीररीत्या स्थापन झालेलं सरकार सत्तेत आहे. असं असताना राज्यपाल एखाद्या गृहीतकावर आधारीत निर्णय…”, सर्वोच्च न्यायालयाची परखड टिप्पणी!

वाचा नेमकं काय म्हटलं सरन्यायाधीशांनी

12:56 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing:

आमदारांनी संगितलं की आम्हाला विद्यमान सरकारचा हिस्सा राहायचं नाही – तुषार मेहता

12:55 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमत चाचणीवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

तुमच्याकडे सभागृहात बहुमत आहे का? यासाठी बहुमत चाचणी असते. सभागृहात कोण नेता असेल, यासाठी बहुमत चाचणी नसते. सभागृहातल्या बहुमताचं नेतृत्व कोण करेल, हा राज्यपालांचा मुद्दाच नाही. तो पक्षांतर्गत निर्णयाचा मुद्दा आहे. जर सभागृहातलं बहुमत हलताना दिसलं, तरच बहुमत चाचणीचा विचार होऊ शकतो – सरन्यायाधीश चंद्रचूड

12:53 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

बहुमत चाचणी सरकारविरोधात नव्हती, तर मुख्यमंत्र्यांविरोधातील अविश्वासासाठी होती – तुषार मेहता

12:51 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

पक्षात मतभेद होते. ते आधीच सरकारमध्ये होते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की एकनाथ शिंदे विधिमंडळ गटाचे नेते म्हणून कायम राहतील. ही बाब बहुमत चाचणीसाठी कारण कशी ठरू शकते? – सरन्यायाधीश चंद्रचूड

12:40 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: राज्यपालांनी कशाच्या आधारावर बहुमत चाचणीचे आदेश दिले? – सरन्यायाधीश

३४ आमदारांनी त्यांचे मतभेद स्पष्ट केले. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारचं बहुमत खाली आलं होतं. पण त्याचा परिणाम काय झाला? राज्यपालांनी त्यांना शिवसेनेचेच सदस्य म्हणून गृहीत धरायला हवं होतं. मग जर ते शिवसेवेच्या ५६ सदस्यांपैकीच असतील तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो? कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले? – सरन्यायाधीशांचा तुषार मेहतांना सवाल

12:37 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय योग्यच – मेहता

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याऐवजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. जर आमदारांनी पक्षाच्या आदेशांविरोधात मतदान केलं, तर दहाव्या परिशिष्टानुसार जी काय कारवाई व्हायची ती होईल. पण आधी राष्ट्रपती राजवटीचं टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी बहुमत चाचणी घ्यायला हवी. राज्यपालांनी या प्रकरणात हेच केलं – तुषार मेहता

12:36 (IST) 15 Mar 2023
वर्धा: पालकमंत्री फडणवीसांची तत्परता; विविध समित्यांवर साडेतिनशे कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ

पक्षाची सत्ता आली की सामान्य कार्यकर्त्यांना आनंद होतो. सत्तेचा लाभ मिळणार, अशी सुप्त भावना असते. आपल्यामार्फत जनतेची कामे मार्गी लागणार, असा भाव विविध अशासकीय समिती मिळाली की उमटतो. तेच चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कदाचित ओळखले असावे.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: मग बहुमताचा प्रश्न येतोच कुठे? – सरन्याधीश

कायदेशीररीत्या स्थापन झालेलं सरकार सत्तेत आहे. राज्यपाल एखाद्या गृहीतकावर आधारीत निर्णय घेऊ शकत नाही. राज्यपालांना त्या ३४ आमदारांना शिवसेनेचे सदस्य म्हणूनच गृहीत धरावं लागेल. जर ते शिवसेनेचेच सदस्य आहेत. तर मग सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? – सरन्यायाधीश चंद्रचूड

12:23 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

या सगळ्या घडामोडी सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरात घडल्या नाहीत. हे सगळं तीन वर्षांनंतर घडत होतं. त्यामुळे अचानक एक दिवस त्या ३४ जणांना वाटलं की काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद आहेत. असं कसं? – सरन्यायाधीश चंद्रचूड

12:15 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही मतभेद नव्हता – सरन्यायाधीश

राज्यपालांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत. एक तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. दोघांकडे मिळून ९७ आमदार आहेत. हाही फार मोठा गट होता. शिवसेनेच्या ५६पैकी ३४ आमदारांनी अविश्वास दर्शवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी एका पक्षात मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते. – सरन्यायाधीश चंद्रचूड

12:08 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: तुषार मेहतांची न्यायालयात शेरोशायरी

मै चुप रहा, तो और गलतफहमिया बढी, वो भी सुना उसने जो मैने कहा नही – तुषार मेहतांची न्यायालयात शेरोशायरी

12:06 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयाचे तुषार मेहतांना प्रतिप्रश्न

राज्यपालांनी त्या आमदारांना विचारायला हवं होतंं की तीन वर्षं तुम्ही सुखाने संसार केला आणि अचानक एका रात्रीत काय झालं की तुम्हाला मतभेद असल्याचा साक्षात्कार कसा झाला? – सरन्यायाधीश

12:04 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: सरकार नेहमी बहुमतात असणं गरजेचं असतं – मेहता

सरकार नेहमी बहुमतात असणं गरजेचं असतं. पण आमदारांच्या पत्रामुळे सरकारकडे बहुमत नाही हे स्पष्ट झालं. कदाचित राज्यपालांच्या निर्देशांमुळे विरोधात असणारे ३४ आमदार ४० झाले असते. पण लोकशाही असंच काम करते. – तुषार मेहता

12:03 (IST) 15 Mar 2023
डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा चाळी, इमारतींना कोपर पश्चिमेतील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून २५० हून अधिक जलवाहिन्यांच्या माध्यमातून चोरुन पाणी पुरवठा केला जात आहे.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 15 Mar 2023
नागपूर: ओबीसींचे वसतिगृह व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठीच! गैरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रवेश नसल्याने रोष

ओबीसी समाजाच्या रेट्यानंतर राज्य सरकारने ओबीसी, व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही वसतिगृहे केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील, अशी अट घालण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: आम्हाला याची काळजी वाटतेय – सरन्यायाधीश

महाराष्ट्र हे एक राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे राज्याला कलंक लागत आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्हाला या सर्व गोष्टींची काळजी वाटते – सरन्यायाधीश चंद्रचूड

11:55 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात का? – सरन्यायाधीश

पक्षातल्या एका गटाला नेतृत्वाशी मतभेद आहेत, तर मग अस्तित्वात असलेल्या सरकारला राज्य सरकार बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का?

11:52 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? – सरन्यायाधीश

राज्यपालांना असं वाटलं की शिवसेनेतील एका गटाला पक्षाच्या आघाडीसोबत जाण्याच्या निर्णयावर विरोध आहे. मग फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का? मग एका अर्थाने ते पक्षच तोडत आहेत – सरन्यायाधीश

11:51 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांचे तुषार मेहतांना उलटप्रश्न

बहुमत चाचणी हीच मुळात सरकार पडण्यामध्ये परावर्तित होऊ शकते. राज्यपालांनी त्यांच्या कार्यालयाचं रुपांतर अशा प्रकारच्या कोणत्या निर्णयासाठी कारणीभूत ठरू देऊ नये – सरन्यायाधीश

11:49 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: सरन्यायाधीशांचा तुषार मेहतांना सवाल…

राज्यपाल फक्त आमदारांच्या पत्राच्या आधारावर म्हणू शकतात का की तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा? – सरन्यायाधीशांचा तुषार मेहतांना सवाल

11:48 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: म्हणजे राज्यपालांकडे तीनच गोष्टी होत्या – सरन्यायाधीश

राज्यपालांसमोर तीनच गोष्टी होत्या. एक ३४ आमदारांनी पारित केलेला प्रस्ताव- एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती, दुसरं ४७ आमदारांनी त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं पाठवलेलं पत्र आणि तिसरं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ३४ आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत दिलेलं पत्र – सरन्यायाधीश

11:45 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ..म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले – तुषार मेहता

राज्यपालांना पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर घटनात्मक तत्वांचं पालन करण्यासाठी राज्यपासांनी बोम्मई, रामेश्वर प्रसाद, शिवराजसिंह चौहान अशा प्रकरणांच्या आधारावर बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले – तुषार मेहता

11:42 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: अपक्ष आमदारांनी राज्यपालांना विनंती केली – तुषार मेहता

सात अपक्ष आमदारांनी राज्यपालांना विनंती केली की मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत – तुषार मेहता

11:35 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: राज्यपालांनी अतिरिक्त सुरक्षेसंदर्भात पत्रव्यवहार केला – मेहता

राज्यपालांनी केंद्रीय गृह सचिव, राज्य गृह विभाग आणि डीजीपींना या आमदारांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यासंदर्भात पत्र लिहिले – तुषार मेहता

11:34 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: ४७ आमदारांनी जीवाला धोका असल्याचं सांगितलं – तुषार मेहता

एकूण ४७ आमदारांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला यासंदर्भातली माहिती दिली – तुषार मेहता

यावेळी तुषार मेहतांनी केंद्रीय गृहसचिवांना पाठवलेल्या पत्राची प्रतही तुषार मेहतांनी न्यायालयासमोर ठेवली.

11:31 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ३८ शिवसेना आमदारांनी जीवाला धोका असल्याचं राज्यपालांना सांगितलं

३८ शिवसेना आमदार, २ प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि ७ अपक्ष आमदारांनी जीवाला धोका असल्याचं राज्यपालांना सांगितलं – तुषार मेहता

11:29 (IST) 15 Mar 2023
लालबागमध्ये महिलेचा मृतदेह सापडला; हत्येचा संशय

मुंबई : लालबागमधील एका सदनिकेत महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: तुषार मेहता यांचे युक्तिवादाचे मुद्दे…

१. राज्यपालांकडे कोणते पुरावे होते?

२. दहाव्या परिशिष्टातील तरतुदींवर राज्यपालांची भूमिका काय?

३. राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात का?

४. फक्त सरकार स्थापनेपूर्वीच राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात का?

५. राज्यपालांनी पक्षाध्यक्ष सोडून एकनाथ शिंदेंनाच का पाचारण केलं?

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)