Maharashtra News Updates, 15 March 2023: महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल. दुसरीकडे राज्याचया अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. तर हे सगळं घडत असताना राज्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्ये पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालय व्यवस्थापनाकडून कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे.
Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
दारु दुकानदार आणि ग्राहक ह्यांच्यातील वाद नवे नाहीत. मात्र, दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना जटपुरा गेट जवळीक आनंद वाइन शॉप येथे घडली आहे.
तुषार मेहतांचा युक्तिवाद ७ मुद्द्यांवर आधारित
SG Mehta: I'd like to point out seven points I need to assist with.
— Live Law (@LiveLawIndia) March 15, 2023
Justice Shah: Confine yourself to Governor only.
SG Mehta: Yes, yes. #SupremeCourtOfIndia #ShivSenaCrisis
न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये होणाऱ्या चर्चांबाबत न्यायालयात कामकाजाच्या सुरुवातीलाच संवाद झाला. यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की जेव्हा मी तरुण वकील होतो.. या वाक्यावर लागलीच न्यायमूर्ती एस. जी. मेहता यांनी “तुम्ही अजूनही तरुण वकील आहात सिब्बलजी” असं म्हणताच न्यायालयात हास्याची लकेर उमटली.
Sr Adv Kapil Sibal: When I was a young lawyer…

SG Mehta: You're still a young lawyer.
Sr Adv Sibal: Thank you so much. When I was a young lawyer, the kind of dialogue that used to go on in Justice Bhagwati or Justice Chandrachud's court was impressive.#SupremeCourtOfIndia
पिंपरी : जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महापालिकेतील सर्व दालने बंद आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेचे कामकाज ठप्प असून पालिकेत शुकशुकाट आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, तुषार मेहतांच्या युक्तिवादाला सुरुवात

या अधिवेशनात २ हजार ३७६ लक्षवेधी मिळाल्या आहेत. २ हजार ६१ विनंत्याही आल्या आहेत. गेल्या ७ ते ८ दिवसांत आपण ५७ लक्षवेधी चर्चेसाठी घेतल्या आहेत – राहुल नार्वेकर
मध्य भारतातील पाच केंद्रात ‘डिजिटल’ पद्धतीने हृदयरोगाचे निदान करण्याबाबत २३८ रुग्णांवर मानवी चाचणी करण्यात आली. ती यशस्वी ठरल्याने भविष्यात ‘डिजिटल’ घडयाळ मनगटावर बांधून ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान करणे शक्य झाले आहे.
अजित पवारांनी उपस्थित केलेली बाब अतिशय गंभीर आहे. आज जे घडलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ऑर्डर ऑफ द डे रात्री १ वाजता निघाला. त्यानंतर मंत्र्यांना ब्रिफिंग घ्यावं लागतं. अशावेळी सकाळी ९.३० ला लक्षवेधी लागली, तर मंत्र्यांना ब्रिफिंगला वेळच मिळत नाही. आम्ही मंत्र्यांना समज देऊ. त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे – देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील रात्री २-२.३० वाजेपर्यंत जागत नाहीत. त्यांना लवकर येऊन बसायला काय हरकत आहे? संसदीय कामकाज मंत्र्यांना जर जमत नसेल, तर त्यांनी थांबायला हवं. मंत्री सभागृहात नसल्यामुळे ७ वक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. हे अतिशय गलिच्छ कामकाज चाललं आहे. यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्याचं कामकाज चाललं आहे – अजित पवार
मी उपमुख्यमंत्री असताना सकाळ ९ वाजता कामकाज असेल तर तेव्हाही येऊन बसायचो. आज सकाळी ९.३० ला कामकाज सुरू झालं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो याची जाणीव आहे. पण संसदीय कामकाज मंत्र्यांनी तरी सकाळी लवकर येऊन बसायला हवं. चंद्रकांत पाटलांवर माझा वैयक्तिक राग नाही. पण सभागृहात बसा ना येऊन जरा. सकाळी कामकाज चालू असताना ६ मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, मनाची काही आहे की नाही? – अजित पवार
गोपीनाथ मुंडेंमुळेच देवेंद्र फडणवीसांना अध्यक्ष केलं. राजनाथ सिंहांनी वरून सांगितलं होतं की एकनाथ खडसे बोलतील तेच होईल. माझ्या दारावर तीन वेळा चकरा मारल्या. शेवटी गोपीनाथ मुंडे माझ्याशी बोलले, तेव्हा मी शिफारस केली. विसरले का हे सगळे? – एकनाथ खडसे
विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं आहे. 'खोदा पहाड, निकला चूहा', अशी खोचक टीका करत अर्थसंकल्पावर विरोधकांकडून तोंडसुख घेतलं जात आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची भूमिका राज्य सरकारकडून घेतली जाण्याची शक्यता असताना मेस्मा कायदा मंजूर केल्याचा निषेध जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी करत आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय फाडून त्याचा निषेध करण्यात येत आहे.
१६ आमदारांची अपात्रता जेव्हा संबंधित यंत्रणा त्यांना अपात्र ठरवेल, तेव्हापासून लागू होईल. त्यामुळे हे १६ आमदार अपात्र ठरले होते आणि त्यांचं मतदान लागू होत नाही या ठाकरे गटाच्या युक्तिवादाला काही अर्थ राहात नाही – उज्ज्वल निकम
मुंबई : कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार ४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा जारी केली आहे. त्यामुळे आता लवकरच या घरांची दुरुस्ती होणार असून, विजेत्या कामगारांना घरांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.
गुरांचा गोठा बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोरेगाव पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला (कंत्राटी) अटक करण्यात आली.
“किती वेळ युक्तिवाद करणार?” शिंदे गटाच्या उत्तरावर न्यायमूर्तींची मिश्किल टिप्पणी!
वाचा काल दिवसभर सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं!
‘त्या’ दोघांचे आठ वर्षे प्रेमप्रकरण चालले… कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांनी प्रेमविवाह केला… गोड मुलगी जन्माला आली… पण, दहा वर्षांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली… दोघांत वाद वाढले… ताटातूट झाली…
उपराजधानीत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण असल्याने ‘एच ३ एन २’ या विषाणूने धुमाकूळ घातल्याची शंका आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू एका खासगी रुग्णालयात झाला आहे.
न्याय फक्त दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटलाही पाहिजे हे न्यायदानाचं एक महत्त्वाचं तत्व आहे – उज्ज्वल निकम
कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी आज काऊंटर करणार आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाकडून महत्त्वाचे पाच मुद्दे सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केले आहेत – उज्ज्वल निकम
शिंदे गटाचा दोन गोष्टींवर भर होता. एक तर आमदारांनी कोणतंही कृत्य केलेलं नाही ज्यामुळे ते अपात्र ठरतात. दुसरा मुद्दा राज्यपालांनी बहुमताची चाचणी घ्यायला सांगण्यात काहीही चुकीचं केलं नाही – उज्ज्वल निकम
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी
Meta Layoff: सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabet आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. वाचा सविस्तर बातमी
सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त २५,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात. वाचा सविस्तर बातमी
पुणे : राज्य शासनाने अर्थसंकल्पात सर्व भूकरमापकांना जमीन मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार असल्याने जमीन मोजणीची प्रकरणे ९० दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.
वर्धा : राज्य शिक्षण मंडळाने विनंती केल्यानंतर मुख्याध्यापक संघटनेच्या संघाने परीक्षा घेण्यास सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र आता एवढेच सहकार्य, उत्तरपत्रिका तपासण्यास सांगू नका. जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटेल तेव्हाच दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून देऊ, अशी रोखठोक भूमिका संघटनेने घेतली आहे.
पुणे : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे विविध क्षेत्रांमध्ये मंत्री म्हणून आणि राजकीय नेते म्हणून जो ठसा जनमानसावर उमटवत आहेत, त्याला दिलेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचं, शिवसेनेचं आणि देशाचंही राजकीय भविष्य आहे असं मी वारंवार सांगतो, त्यावर हा शिक्कामोर्तब आहे – संजय राऊत
प्रकाश सुर्वेंनी समोर यायला पाहिजे. पहिले गुन्हेगार ते आहेत मुका घेणारे. दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. आता नव्याने तो सिनेमा शिंदे गट सुरू करणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अश्लील वर्तन करत असाल आणि त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर पहिला गुन्हा असं वर्तन करणाऱ्यांविरोधात दाखल केला पाहिजे. तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा. आमच्याकडे बोट दाखवू नका – संजय राऊत