Maharashtra Budget Session, 23 March 2023: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणातून महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर परखड भाष्य केलं. त्यांनी केलेल्या आरोपांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!
पुणे: युवतीला गांजाची नशा करण्यासाठी धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. युवतीच्या नाका- तोंडात गांजाचा धूर सोडल्याने युवतीला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केला.
पुणे: कोरेगाव पार्क भागातील ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बेकायदा जमाव करुन आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध घोषणाबाजी तसेच आश्रमात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तर दुसरीकडे विरोधकांकडून सत्ताधारी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्याची टीका करत घोषणाबाजी करण्यात आली.
दुसरं काही तुम्हाला काम नसेल, तर नाक-कान टोचण्याचे उद्योग सुरू करा. काही हरकत नाही. प्रत्येक पक्षाची एक भूमिका घेऊन प्रत्येकजण पुढे जात असतं. शिवसेना सेनेच्या भूमिकेतून पुढे चालली आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राज्याची जनता आहे. कुणाला धनुष्यबाण, नाव मिळालं म्हणून त्याने काही फरक पडत नाही – संजय राऊत
मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. सकाळी वाचलं. त्यांच्या पक्षाला १८-१९ वर्षं झाली. पक्ष वयात आला आहे. पण त्यांच्या पक्षाचं काय चाललंय माहिती नाही. १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत. उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे, भाजपा उद्धव ठाकरेंवरच बोलतायत. याचा अर्थ उद्धव ठाकरेंची भीती सगळ्यांना वाटतेय – संजय राऊत
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग पंजाबमधून फरार झाला असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या भाषणात माहीमच्या समुद्रात उभारण्यात आलेल्या मजारचा मुद्दा उपस्थित केला होता. तिथे दुसरं हाजीअली उभं करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच महिन्याभरात त्यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्याशेजारी सर्वात मोठं गणपती मंदीर बांधण्याचाही इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालिका प्रशासनाने या बांधकामावर तोडक कारवाई केली आहे.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!