Maharashtra Budget Session, 16 March 2023: एकीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जातं.

Live Updates

Marathi Batmya: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

14:27 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला पुन्हा सुरुवात

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

13:13 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: लंच ब्रेकनंतर अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार

लंचब्रेकनंतर २ वाजता ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार

13:12 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले. पण त्याच प्रकरणाइतकंच हे प्रकरण महत्त्वाचं आणि प्रभाव पाडणारं आहे. हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक असा क्षण आहे, जेव्हा लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला याची खात्री आहे, की या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपण, आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा – कपिल सिब्बल

13:06 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात पक्षानं ज्या व्यक्तीला पदावरून दूर केलं आहे, त्या व्यक्तीला मान्यता दिली आहे – कपिल सिब्बल

13:05 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

आसाममध्ये बसून ३९ लोकांनी सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द केली. ही कुठली प्रतिक्रिया आहे? ते २०१९पासून प्रतोदपदी आहेत – कपिल सिब्बल

13:04 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

२१ तारखेला जर ते पत्र पाठवलं असेल, तर त्या पत्रात एकनाथ शिंदे गटनेतेपदावर कायम असल्याचा का उल्लेख करण्यात आला? ते तर पदावर कायम होतेच ना? – कपिल सिब्बल

13:03 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

त्यांना विधिमंडळ पदावरून काढलेलं असताना अशा वेळी त्यांनी आसाममध्ये भाजपाच्या मांडीवर बसून लिहिलेल्या या पत्राची काय विश्वासार्हता राहते? – कपिल सिब्बल

13:02 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचं २१ जूनचं पत्र..

हा गट आसाममध्ये बसलेला असताना हे पत्र लिहिलं गेलं. त्यंना हे माहिती होतं की २१ जूनला एकनाथ शिंदेंना पदावरून हटवलं आहे. त्यामुळे हे स्वत:हून पाठवलेलं पत्र आहे. २१ जूनच्या आधी हे पत्र अस्तित्वातच नव्हतं. त्याआधीच्या परिस्थितीवर हे पत्र काही बोलतच नाहीये. या पत्रात अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही ज्यात त्यांनी जाहीरपणे त्यांची नाराजी किंवा मतभेद बोलून दाखवली असेल. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याच्या कृतीचं समर्थन करण्यासाठीचं हे पत्र आहे – कपिल सिब्बल

13:00 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: उपाध्यक्षांवर कोणत्या आधारावर अविश्वास ठराव आणला – कपिल सिब्बल

त्यांनी नबम रेबिया प्रकरणाचा चुकीचा अर्थ लावला. हे नबम रेबियामध्ये नाहीये. कोणताही अविश्वास प्रस्ताव नव्हता. याचे गंभीर नागरी परिणाम होतात. उपाध्यक्ष एका संसदीय पदावर होते. त्यांना त्या पदावरून काढलं. त्यांना हेही सांगितलं नाही की त्यांना का काढलं. त्यामुळेच राज्यघटना म्हणते की जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतं, तेव्हा जर अविश्वास ठराव आला आणि तो गृहीत धरला, तरच त्या परिस्थितीत उपाध्यक्ष खुर्चीवर बसू शकत नाही. ते सभागृहात बसून त्यांची बाजू मांडतील. प्रक्रिया हेच सांगते – कपिल सिब्बल

12:57 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ही कसली नोटीस आहे? उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची? – कपिल सिब्बल

२१ जूनची तारीख असलेलं हे पत्र २२ जूनला सकाळी ७.३३ वाजता सचिवालयाला प्राप्त झालं. या पत्रात म्हटलं होतं की तुम्हाला २०१९मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पण २०२१ फेब्रुवारीमध्ये अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. आम्हाला असं वाटतंय की तुम्हाला आता उपाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही कसली नोटीस आहे? उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची? – कपिल सिब्बल

12:48 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नबम रेबिया प्रकरणाचा दाखला

कपिल सिब्बल यांनी दिला नबम रेबिया प्रकरणाचा दाखला

12:44 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

एकनाथ शिंदेंनी दावा केला की ते विधिमंडळ पक्षनेते आहेत. कशाच्या आधारावर? तुम्हाला २२ जून रोजीच पदावरून दूर केलं होतं – कपिल सिब्बल

12:43 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: ..मग तुम्ही आसाममध्ये काय करत होतात? – कपिल सिब्बल

त्यांनी काल युक्तिवाद केला की व्हीप फक्त सभागृहातच बजावला जाऊ शकतो. सभागृहाबाहेर व्हीप काम करू शकत नाही. मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपाच्या मांडीवर बसला आहात आणि तुम्ही एका अशा प्रतोदला पदावरून दूर करत आहात जो राजकीय पक्षानं नियुक्त केला होता – कपिल सिब्बल

12:41 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: .. म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं – सिब्बल

एकनाथ शिंदेंनी विश्वासघात केल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं – कपिल सिब्बल

12:39 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्षच प्रतोद, गटनेत्याची नियुक्ती करतो – सिब्बल

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे राजकीय पक्षानं, सदस्यांनी त्यांचा नेता म्हणून निवडलेला असतो. राजकीय पक्षानं त्यासंदर्भातले अधिकार दिलेले असतात. त्यामुळे राजकीय पक्षच गटनेता आणि प्रतोद यांची नियुक्ती करत असतो – कपिल सिब्बल

12:30 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: हे सगळंच घटनाविरोधी आहे – सिब्बल

हे सगळं प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे १९ जुलैपूर्वी घडलं. त्यामुळे हे सगळंच घटनाविरोधी आहे. कारण राज्यपालंनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली – कपिल सिब्बल

12:28 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या भूमिका बदलत राहिल्या – कपिल सिब्बल

आधी शिंदे गट म्हणाले की ते बाहेर पडले आहेत. नंतर ते म्हणाले की आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता ते म्हणतात आम्ही पक्षातच आहोत. त्यामुळे शिंदे गटाकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या – कपिल सिब्बल

12:25 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: हा कसला राजकीय पक्ष – सिब्बल

निवडणूक आयोग किंवा कोणत्याही घटनात्मक आधाराशिवाय विधिमंडळ गटातला एक गट असा दावा करत होता की तेच शिवसेना राजकीय पक्ष आहेत. हा कसला राजकीय पक्ष – कपिल सिब्बल

12:21 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: त्यांना सरकार पाडायचं होतं, म्हणून… – सिब्बल

सरकार कोसळलं तेव्हा अधिवेशन होऊ घातलं होतं. त्यात अर्थसंकल्पीय विधेयकांवर मतदान होणार होतं. त्याच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. सरकार पडलं असतं. पण यांना सरकार पाडायचं होतं. मुख्यमंत्री बनायचं होतं. त्याचवेळी स्वत:ची आमदारकी घालवायची नव्हती – कपिल सिब्बल

12:14 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: आम्ही बहुमत चाचणीच्या विरोधात नाही, पण… – सिब्बल

आम्ही बहुमत चाचणीच्या विरोधात नाही. पण ज्या आधारावर बहुमत चाचणीचे आदेश दिले गेले, त्याविरोधात आम्ही आहोत – कपिल सिब्बल

12:10 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: मग तर राज्यपाल कधीच बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकणार नाहीत – सरन्यायाधीश

संसदीय लोकशाहीचं मूल्य आहे की सरकारवर सभागृहाचा विश्वास असायला हवा. तुमच्या लॉजिकनुसार राज्यपाल कधीच बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकणार नाहीत – सरन्यायाधीश चंद्रचूड

11:59 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ..तर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात – कपिल सिब्बल

आघाडीतील एखादा सदस्य पक्ष बाहेर पडला, तर बहुमत चाचणीसंदर्भात राज्यपाल निर्णय घेऊ शकतात. मग राज्यपाल सभागृहातील बहुमतावर परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढू शकतात – कपिल सिब्बल

11:55 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपाल विचारसरणी नसलेल्या गटाला मान्यता देऊ शकत नाहीत – सिब्बल

विधिमंडळ गटाकडे कोणतीही विचारसरणी नसते. राज्यपाल विचारसरणी नसलेल्या गटाला मान्यता देऊ शकत नाहीत. विधिमंडळ नियमावलीमध्ये कोणत्याही गटाच्या अस्तित्वाला मान्यताच नाही. सगळे स्वतंत्र सदस्य असतात – कपिल सिब्बल

11:54 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: दहावं परिशिष्ट अस्तित्वातच नसतं, तर राज्यपाल असं करू शकले असते – सिब्बल

दहावं परिशिष्ट अस्तित्वातच नसतं, तर राज्यपाल असं करू शकले असते – सिब्बल

11:53 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांचा कपिल सिब्बलांना सवाल

राज्यपाल संख्या बघून असं म्हणू शकत नाहीत का की बाहेर आलेल्या गटाच्या कृतीचा परिणाम सभागृहातील बहुमतावर परिणाम होतोय की नाही? – सरन्यायाधीश

11:52 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी घटनाविरोधी काम केलं – कपिल सिब्बल

राज्यपाल विधिमंडळाचे घटक आहेत. पण त्यांनी विधिमंडळ पक्षातल्या एका गटाला मान्यता देण्यासाठी घटनेच्या चौकटीबाहेर जाऊन काम केलं – कपिल सिब्बल

11:48 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: विधिमंडळ गटाकडे विचारसरणी नसते – कपिल सिब्बल

विधिमंडळ गटाकडे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधित्वाशिवाय इतर कोणतीही विचारसरणी नसते – कपिल सिब्बल

11:47 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: याचे परिणाम भयंकर होतील – सिब्बल

त्यांच्याकडून केला जाणारा युक्तिवाद घटनाविरोधी आहे. हे घटनेसाठी धोकादायक ठरेल – कपिल सिब्बल

11:43 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

निवडणूक पूर्व पक्षांची आघाडी, निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष, निवडणुकीनंतरची पक्षांची युती आणि निवडणुकीनंतरची पक्षांची आघाडी या सर्व गोष्टींमध्ये पक्षांना मान्यता आहे. जर संपूर्ण शिवसेना भाजपाबरोबर गेली, तर राज्यपाल बहुमत चाचणी घेऊ शकतात – कपिल सिब्बल

11:41 (IST) 16 Mar 2023
डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके

डोंबिवली – मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छपरावर पत्रे टाकण्याचे आणि याच फलाटावर सरकत्या जिन्यासाठी सुरू केलेले काम गेल्या महिनाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते. सरकत्या जिन्याच्या कामाच्या ठिकाणी संरक्षित जाळ्या लावल्या असल्याने गर्दीच्या वेळेत या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)