Maharashtra Budget Session, 16 March 2023: एकीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जातं.

Live Updates

Marathi Batmya: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:41 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

कोणताही सदस्य सभागृहात त्या पक्षाच्या आदेशांनुसारच काम करू शकतो. सभागृहाबाहेर त्याचे मतभेद असू शकतात – सिब्बल

11:39 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: एकाच सदस्य विधिमंडळात असेल, तर तो पक्षाचा दावा करू शकेल का? – सिब्बल

कुठलाही सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतो. सभागृहात त्या पक्षाचा सदस्य म्हणून काम करतो. त्या पक्षाचे नियम त्या सदस्यावर बंधनकारक असतात. त्यामुळे विधिमंडळ गट आपणच पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. विधिमंडळ गटात एकच सदस्य असू शकतो. मग तो आपणच पक्ष असल्याचा दावा करू शकतो का? – कपिल सिब्बल

11:37 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ते शिवसेना असल्याचा दावा घटनाविरोधी – सिब्बल

आम्ही शिवसेना आहोत हा दावा घटनेच्या चौकटीविरोधात आहे. कारण कोणताही पक्ष लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार नोंदणीकृत असतो. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे नोंद असलेला पक्षच पक्ष असू शकतो. त्या पक्षाचा विधिंमडळ गट पक्ष ठरू शकत नाही – कपिल सिब्बल

11:32 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing:

कोणत्या घटनात्मक आधारावर राज्यपाल एखाद्या विधिमंडळ गटाच्या एका गटाच्या दाव्यावर बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? – कपिल सिब्बल

11:32 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: फक्त ८ मंत्र्यांचा ३४आमदारांमध्ये समावेश होता – सिब्बल

फक्त ८ मंत्री त्या ३४ आमदारांमध्ये होते. मग ते कसं म्हणू शकतात की त्यांना सरकारमधून बाहेर पडायचं होतं? इतर मंत्री त्यांच्याबरोबर नव्हते – कपिल सिब्बल

11:31 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: नाहीतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल – सिब्बल

राज्यपालांनी घटनात्मक मुद्द्यांवर निर्णय घ्यायला हवा. राज्यपालांनी सांगितलं की ३४ आमदार माझ्याकडे आले आणि मी त्यावर निर्णय घेतला. ही प्रक्रिया म्हणून बरोबर आहे. पण राज्यपाल फक्त पक्ष किंवा आघाड्यांशी चर्चा करू शकतात, वैयक्तिक कुणाशीही नाही. नाहीतर त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल – कपिल सिब्बल

11:29 (IST) 16 Mar 2023
ठाणे : मित्राला उसने पैसे देणे महागात; पैसे परत मागितल्याने एकाला सिमेंटची वीट फेकून मारली

ठाणे : कापूरबावडी येथील नळपाडा परिसरात उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून एका तरुणाला सिमेंटची वीट फेकून मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात प्रवीण जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

11:29 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांच्या भूमिकेवर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

11:27 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: अपात्रतेची कारवाई थांबवता येत नाही – सिब्बल

अपात्रतेची कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबवता येत नाही. दुसरे अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी त्यावर निर्णय घ्यायला हवा होता – कपिल सिब्बल

11:25 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीला सुरुवात…

11:18 (IST) 16 Mar 2023
“राज्यपाल Whip बाबत का बोलतायत? हा विषय तर…”, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात परखड युक्तिवाद; ‘या’ नियमाचा दिला दाखला!

कपिल सिब्बल म्हणतात, “एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचं पत्र शिवसेनेनं अध्यक्षांना दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारलंही होतं. मग राज्यपालांनी कोणत्या कायद्यानुसार…!”

वाचा सर्वोच्च न्यायालयातला कपिल सिब्बल यांचा कालचा युक्तिवाद

11:16 (IST) 16 Mar 2023
लोकसभा निवडणुकीसाठी मविआचं जागावाटपावर शिक्कामोर्तब? ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्याची चर्चा!

लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपासाठीचा फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

वाचा सविस्तर

11:15 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: “ते जर शिवसेना असतील तर मग निवडणूक आयोगासमोर त्यांनी…”, कपिल सिब्बलांनी ठेवलं ‘या’ मुद्द्यावर बोट!

“ते जर शिवसेना असतील तर मग निवडणूक आयोगासमोर त्यांनी…”, कपिल सिब्बलांनी ठेवलं ‘या’ मुद्द्यावर बोट!

वाचा काल सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय काय घडलं?

11:06 (IST) 16 Mar 2023
समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र; औरंगजेबाचे उदात्तीकरण

ठाणे : इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नंदूरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:59 (IST) 16 Mar 2023
लग्न चार दिवसांवर अन् नियोजित वराने सासुरवाडीतच उचलले टोकाचे पाऊल

वर्धा: लग्न चार दिवसांवर येऊन ठेपलेले. पण वाद उसळून आल्याने हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाने अर्ध्यावरती डाव सोडला.

सविस्तर वाचा..

10:58 (IST) 16 Mar 2023
शालांत विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणवाढीस पुन्हा मुदतवाढ, या तारखेपर्यंत..

वर्धा : शास्त्रीय कला, चित्रकलेत प्रावीण्य व लोककला प्रकारात सहभागी दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

10:57 (IST) 16 Mar 2023
उरणमध्ये बरसल्या अवेळी सरी; दोन मिनिटांच्या सरींनी नागरिकांची तारांबळ

उरण : गुरुवारी सकाळी ८ वाजता अचानक आलेल्या अवेळी पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. या सरी अवघ्या दोन मिनिटे बरसल्या. यामुळे नागरीकांना पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधण्याची घाई झाली होती. मागील अनेक दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी पाऊस येत नव्हता, गुरुवारी मात्र तो आला आणि त्याने सकाळी उरणच्या नागरिकांची तारांबळ उडवली.

सविस्तर वाचा..

10:48 (IST) 16 Mar 2023
सावधान..! उपराजधानीत आणखी एका ‘एच ३ एन २’ग्रस्ताचा मृत्यू

नागपूर महापालिकेच्या मृत्यू विश्लेषण समितीने पहिल्या ‘एच ३ एन २’ ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला विषाणू नव्हे तर इतर सहआजार कारण असल्याचा निष्कर्ष दिला असतानाच आता एम्समध्ये या विषाणूने ग्रस्त एका रुग्णाच्या मृत्यूने चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 16 Mar 2023

नागपूर : नागपूर महापालिकेच्या मृत्यू विश्लेषण समितीने पहिल्या ‘एच ३ एन २’ ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला विषाणू नव्हे तर इतर सहआजार कारण असल्याचा निष्कर्ष दिला असतानाच आता एम्समध्ये या विषाणूने ग्रस्त एका रुग्णाच्या मृत्यूने चिंता वाढली आहे. तर एका खासगी रुग्णालयात ५ रुग्णाची महिन्याभरात नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा..

10:46 (IST) 16 Mar 2023
पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे; राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा; काळ्या फिती लावून कामकाज

पिंपरी : जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे. पेन्शनच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण, काळ्या फिती लावून कामकाज सुरू केल्याचे कर्मचारी महासंघाच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा..

10:30 (IST) 16 Mar 2023
पुणे पोलिसांचा मॉर्निंग वॉक; टेकड्या, उद्यानांच्या परिसरात गस्त आणि नागरिकांशी संवाद

पुणे : शहरातील उद्याने, टेकड्यांच्या परिसरात फिरायला येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून दररोज सकाळी आणि सायंकाळी गस्त घालण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षा तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोलिसांनी ‘माॅनिंग वाॅक’ उपक्रम सुरू केला आहे.

सविस्तर वाचा..

10:29 (IST) 16 Mar 2023
विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील रहिवासी साईनाथ नरोटे या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात आली. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे (२७) रा.मर्दहूर,ता. भामरागड असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा..

10:28 (IST) 16 Mar 2023
नागपूर : संपात सहभागी झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

नागपूर: जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या दिवशी संपात सहभागी झालेले बहुतांश कर्मचारी दुसऱ्या दिवशी बुधवारी कामावर परतले. त्यामुळे मुख्यालयासह झोन कार्यालयांतील थांबलेले कामकाज सुरळीत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, संपावर न परतणाऱ्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली.

सविस्तर वाचा…

10:27 (IST) 16 Mar 2023
पिंपरीतील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला खंडणी आणि मारहाण प्रकरणी अटक

पिंपरी: चिंचवड शहरातील कुख्यात गुंड बाळा आप्पा वाघेरेला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैशांच्या व्यवहारातून व्यवसायिकाचे अपहरण करून सात लाखांची खंडणी मागितल्याने ही कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

10:24 (IST) 16 Mar 2023
कर्मचारी संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची उच्च न्यायालयात धाव

शासकीय-निमशासकीय कर्मचारी संपाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की वैद्यकीय सेवेसंदर्भात कर्मचारी, डॉक्टर गैरहजर असतील तर कारवाईचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असतील, तर त्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडायला हरकत नाही. फक्त राजकीय भावनेतून सामान्य नागरिकांना मनस्ताप होत असेल तर ते घटनाविरोधी आहे”, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

10:04 (IST) 16 Mar 2023
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांना ACB ची नोटीस

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पत्नी, भाऊ आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, “आपण कोणत्याही नोटिसला घाबरत नाही”, असं म्हणत राजन साळवींनी या प्रकारावर टीका केली आहे. तसेच, “मला नोटीस खरंतर यायलाच नको होती. पण ती आली. आम्ही नोटीसला सामोरे गेलो. पण माझी सरकारला मागणी आहे. तुमचं टार्गेट मी आहे. त्यामुळे माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला, माझ्या भागातले स्थानिक सरपंचांना त्रास देऊ नये”, असंही राजन साळवी यावेळी म्हणाले.

10:01 (IST) 16 Mar 2023
राज्यभरातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा नाही

राज्यातील जवळपास १६ लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेले असून आज संपाचा तिसरा दिवस आहे. अद्याप या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेलें नाही.

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)