Maharashtra Budget Session Updates, 20 March 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये जोरदार भाषण करत उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. तसंच राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? शिवसेना जिथे कमकुवत आहे ती मजबूत करतो मला तेवढा भाग द्या असंच म्हटलं होतं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असाही उल्लेख एकनाथ शिंदेंनी केला. या भाषणाचे पडसाद आता दिवसभर उमटतीलच. सुषमा अंधारे यांनी या भाषणावर टीका करून झाली आहे. मी गद्दार नाही खुद्दार हे एकनाथ शिंदेंचं वाक्य म्हणजे दशकातला उत्तम जोक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय आज अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. या अधिवेशनात काय काय घडणार? कुठली विधेयकं पास होणार? कशावर चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडतील. त्यावरही आपलं लक्ष असेलच. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या विविध बातम्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढ विषयावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पदावरून दीपक केसरकर यांना हटवण्यात यावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
नवी मुंबई : १५ मार्चला संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील नेरुळ सेक्टर ६ येथे सावजी मंजिरी उर्फ पटेल या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या बांधकाम व्यावसायिकांच्या स्पर्धेत झाली असावी, असा अंदाज सुरवातीला होता. मात्र या हत्येचे धागेदारे २५ वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित असून, गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणी पोलीसांनी चौघांना अटक केली असून या खूनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत असून तो फरार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
डोंबिवलीत नववर्ष शोभा यात्रेच्या मार्गात राजकीय नेत्यांचे भव्य फलक, रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भव्य कमानी उभारण्यात आल्याने हे नववर्षाचे स्वागत आहे की, कोणत्या निवडणुकीची तयारी आहे, असे उव्दिग्न प्रश्न शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यात वनखात्याला सातत्याने अपयश येत आहे. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा संघर्ष अधिकच मोठा आहे. २०२२ या एका वर्षात या जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ५३ लोक मृत्युमुखी पडले.
वातावरणातील बदल संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना येत्या पावसाळ्यात ‘अल निनो’मुळे पर्जन्यमानात घट होणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सूचित केले आहे.
पुणे : भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सुखोई – ३० – एमकेआय या लढाऊ विमानासाठी गतीअवरोध तंत्राचा म्हणजेच एअरक्राफ्ट अरेस्टर बॅरिअर वापर करुन अपघात टाळण्यात वैमानिकांना यश आले आहे. पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनवर ही घटना घडली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीला रविवारी ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. मतदारांचे मतदान केंद्र बदलल्याने आणि प्रशासनाकडून मतदान वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा प्रचार प्रसार न केल्याने केवळ २३ टक्केच मतदान झाले आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यंदा उन्हाळा महिनाभरआधीच म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरु झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या महिनाभरापासून कोयता गँगचे गुन्हे काहीसे कमी झाले असताना पर्वती गाव परिसरात कोयता गँगने पुन्हा दहशत माजविली.
अवैध दारूविक्रीने चर्चेत असलेला वर्धा जिल्हा आता थेट पिस्तूल सापडल्याने चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाल्याने यातील गुंडांवर पोलीस नजर ठेवून होते. इतवारा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार रीतिक तोडसाम हा पुन्हा सूड घेण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण होती.
काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांचे दर्शन दुर्लभ झाले. मात्र, अकोल्यातील ऑनलाइन चिमणी गणनेमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली. शहरातील ४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन होत असल्याचा निष्कार्ष काढण्यात आला.
विदर्भाच्या संघात निवडीचे आमिष दाखवून दोघा आरोपींनी मुंबईच्या एका कबड्डीपटूची १.७० लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडीने २३ मार्चपर्यंत कारवाई करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे
‘जी- २०’चे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी सन्मानाची बाब आहे. भारताचा मान जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वाढतच चालला आहे. भारत देशाकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे काँग्रेसला भीती वाटत असून राहुल गांधी परदेशातून मदतीच्या शोधात आहेत. ते परदेशी संस्थांकडून मदत मागत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातील संपकरी विविध संघटनांच्या समन्वय समितीला आज शासनाकडून चर्चेचे निमंत्रण आले. पण, दुपारी अकराची वेळ देऊनही बैठक सुरू न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे.
मुंबई: म्हाडा प्राधिकरणाने मुंबईत ठिकठिकाणी बांधलेली शौचालये आता महापालिकेमार्फत दुरुस्त केली जाणार आहेत. या शौचालयांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मुंबई महापालिकेला सुमारे १८८.८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे २९०० शौचालयांची पालिका दुरुस्त करणार आहे.
डोंबिवली येथील शीळ रस्त्यावरील गोळवली-दावडी गाव हद्दीतील सुमारे २५ हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या रिजेन्सी अनंतम, रिजेन्सी गृहसंकुलात गेल्या आठवड्यापासून पुन्हा तीव्र पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. संतप्त झालेल्या रहिवाशांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
पुणे: सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात; पायर्यांवर ठिय्या देत जोरदार निदर्शने. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या.
पुणे: प्रेमाचे नाटक करुन तरुणाकडून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये उकळणाऱ्या तरुणीच्या धमक्यांमुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.
नागपूर: हिंगणा तालुक्यातील गुमगावमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग (३५३) रविवारी झालेल्या पावसाने संपूर्णपणे चिखलाने माखला आहे. या महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून अपूर्ण आहे. कंत्राटदाराने २ किमीच्या रस्त्यावर केवळ मुरूम टाकून ठेवला आहे अवकाळी पावसाने या मार्गावर पूर्ण चिखल झाला. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे.
नागपूर: ‘ओटीटी’वर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
वर्धा: मध्य रेल्वेच्या काही प्रवासी गाड्यांमधून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती आहे. रेल्वे पोलीस दलाने काही दिवसापासून पाळत ठेवणे सुरू केले होते.काही गाड्यांची खास तपासणी सुरू झाली होती.
अमरावती : भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाविषयी वक्तव्य केल्यानंतर सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे अती वेगाने आलेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर जाऊन रस्त्यावर उलटला,त्यामुळे चालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,तर या ठिकाणची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती,मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, उलटलेला कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली,या कंटेनरमध्ये माल असल्याने आतील मालाचेही नुकसान झाले असून,सुदैवाने वेळीच लक्षात आल्याने चालक आणि वाहक दोघांनीही उड्या मारून आपला जीव वाचवला.