Maharashtra Budget Session Updates, 20 March 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये जोरदार भाषण करत उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. तसंच राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? शिवसेना जिथे कमकुवत आहे ती मजबूत करतो मला तेवढा भाग द्या असंच म्हटलं होतं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असाही उल्लेख एकनाथ शिंदेंनी केला. या भाषणाचे पडसाद आता दिवसभर उमटतीलच. सुषमा अंधारे यांनी या भाषणावर टीका करून झाली आहे. मी गद्दार नाही खुद्दार हे एकनाथ शिंदेंचं वाक्य म्हणजे दशकातला उत्तम जोक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय आज अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. या अधिवेशनात काय काय घडणार? कुठली विधेयकं पास होणार? कशावर चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडतील. त्यावरही आपलं लक्ष असेलच. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या विविध बातम्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates
10:17 (IST) 20 Mar 2023
पावसामुळे गोंदिया जिल्हा ‘ठंडा-ठंडा, कूल-कूल’; तापमान २६ अंशांवर

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासून वादळी वारा व दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. याच्या परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्याचा पारा चांगलाच घसरला असून, रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान थेट २६अंशांवर घसरले होते. शिवाय रविवारीही दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असल्याने त्यामुळे आणखी काही दिवस असेच वातावरण राहणार असे दिसून येते आहेत.

10:12 (IST) 20 Mar 2023
सलमान खानला धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. लॉरेन्स बिश्नोईने मुलाखातीत हा दावा केला होता की, “सलमान खानला ठार करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.” ही धमकी आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

मुंबई पोलिसांनी काय उचललं पाऊल?

मुंबईतल्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी कलम ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ या अन्वये प्रकरण दाखल केलं आहे. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली आहे.

10:10 (IST) 20 Mar 2023
एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात, पण…”, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये भाषण केलं. ते भाषण उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील.’मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.