महाराष्ट्रातल्या बुलढाणा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन २५ लोकांचा मृत्यू झाला. ही बस आधी एका खांबाला आदळली, त्यानंतर डिव्हायडरला आदळून उलटली. यामुळे या बसला आग लागली. ही आग डिझेच्या टँकपर्यंत पोहचल्याने त्या टँकचा स्फोट झाला आणि २५ प्रवासी या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. बुलढाण्यातला सिंदखेड राजा भागात हा अपघात रात्री १.२२ च्या सुमारास झाला.
वाचलेल्या प्रवाशाने काय सांगितलं?
या अपघातातून जिवंत वाचलेल्या एका प्रवाशाने सांगितलं, मी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसलो होतो. समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला. आमच्या बसचा टायर फुटला. त्यानंतर बसला आग लागली. बघता बघता आग पसरु लागली आणि वाढली. या ठिकाणी १० ते १५ मिनिटात अग्निशमन दलाचे लोक आले. त्यांननी आग नियंत्रणात आणली.
पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले होते. तिथल्या एका स्थानिकाने सांगितलं की आम्ही पाहिलं की चार ते पाच प्रवासी काच फोडून बाहेर पडले आम्ही पाहिलं. तसंच या प्रवाशाने सांगितलं की आम्ही मदतीसाठी ओरडत होतो. आकांत करत होतो पण कुणीही मदतीसाठी थांबत नव्हतं.
संदीप मेहेत्रे हे शेजारच्याच गावात राहतात त्यांनी काय सांगितलं?
आम्ही जेव्हा अपघात स्थळी पोहचलो तेव्हा आम्ही पाहिलं की इथलं दृश्य पाहिलं ते भयंकर होतं. टायर बाजूला पडले होते. संपूर्ण बसने पेट घेतला होता. एकंदरीत खूप भयंकर परिस्थिती या ठिकाणी होती. आम्हाला सगळं दिसत होतं पण आम्ही काही करु शकत नव्हतो. अपघात झाल्यानंतर काही जण मागच्या बाजूला पळाले आणि काही लोक मागच्या बाजूला पळाले. पण त्यांच्याजवळच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या नाहीत ते होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला अपघातातून वाचलेल्या लोकांनी हे देखील सांगितलं की, अपघातानंतर आम्ही लोकांना थांबण्यासाठी याचना करत होतो आकांत करत होतो. मात्र भावनाशून्य लोक मुळीच थांबले नाहीत.
तीन चार जण खाली आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की स्फोट झाल्यावर कुणालाच बाहेर येता आलं नाही. त्यानंतर बसमध्ये स्फोट झाला. लोकांना थांबवण्यासाठी ते याचना करत होते. पण कुणीही थांबलं नाही जर लोक थांबले असते, मदत केली असती तर मागच्या बाजूला असलेले लोक वाचू शकले असते असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.