महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासाठी तब्बल एक हजार ३८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून मंदिरातील एकूण २८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा येथील रस्ते विकासासाठी ३६७ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी हे निर्णय घेण्यात आले.

सात वर्षानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी उस्मानाबाद आणि औरंगाबाद ही दोन्ही नावे वगळून धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर या नावाच्या फलकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांनी दिवसभरात उस्मानाबाद नाव पुसून त्याठिकाणी धाराशिव करण्यात आले.

carnac Bridge to be inaugurated in June Additional Commissioner inspects bridge work Mumbai news
कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला

हेही वाचा >>> सातारा: सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा- बापू बांगर

तुळजाभवानी देवी मंदिर आणि परिसरातील २८ कामांसाठी विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला होता. १६  जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या यंत्रपूजन कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी या विकास आराखड्यासाठी त्यांनी हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार नवीन महाद्वार, मंदिरातील सभामंडप, १०५ फूट उंचीची तुळजाभवानी देवीचे शिल्प, लाईट आणि साउंड शो, वाहनतळ आशा महत्वाच्या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा तालुक्यातील रस्त्यांसाठी ३६७  कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांचे मंदिर व अन्य पुरातन स्थळांच्या विकासासाठी २० कोटी रुपये, माणकेश्वर येथील हेमाडपंथी मंदिराच्या विकासासाठी ११ कोटी आणि जागजी येथील महालक्ष्मी मंदिरासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा >>> “ओबीसींच्या आरक्षणात आम्ही वाटेकरी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा निर्णय

धाराशिव येथील अनेक वर्षांपासून रखडलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्नही या बैठकीत निकाली निघाला आहे. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनची जागा वैद्यकीय महाविद्यालयास देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या लातूर-बार्शी-टेंभुर्णी या महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.

Story img Loader