Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच महायुतीत मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु असल्याचंही बोललं जात होतं. मात्र,आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

नागपूरमधील राजभवनावर मंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान, महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळतात? आणि कोणत्या नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी मिळते? तसेच या मंत्रिमंडळात कोणत्या नवनिर्वाचित चेहऱ्यांना संधी देण्यात येते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या ९ नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Chandrasekhar Bawankule , Chandrasekhar Bawankule bjp state president,
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”

हेही वाचा : Live: पंकजा मुंडे यांचे जोरदार कमबॅक, कॅबिनेट मंत्रीपदाची घेतली शपथ

राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कोणत्या नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली?

-हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, तर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

क्र.मंत्र्याचं नावमंत्रीपद
हसन मुश्रीफकॅबिनेट मंत्री
धनंजय मुंडेकॅबिनेट मंत्री
दत्तात्रय भरणेकॅबिनेट मंत्री
आदिती तटकरेकॅबिनेट मंत्री
माणिकराव कोकाटेकॅबिनेट मंत्री
नरहरी झिरवाळकॅबिनेट मंत्री
मकरंद जाधवकॅबिनेट मंत्री
बाबासाहेब पाटीलकॅबिनेट मंत्री
इंद्रनील नाईकराज्यमंत्री

कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळाली?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. या मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्री अशी ३९ आमदारांचा शपथविधी संपन्न झाला आहे. यामध्ये भाजपाचे १९, राष्ट्रवादी ९ तर शिवसेनेच्या ११ आमदारांनी शपथ घेतली आहे.

Story img Loader