Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात यश मिळवूनही महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी १२ दिवस लागले. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर रोजी) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यामध्ये ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आता ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असणार आहे. असं असलं तरी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात चार महिला आमदारांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं. लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा देखील झाली.

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीला किती मंत्रि‍पदे मिळाली? कोणत्या १० नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली? वाचा यादी!

दरम्यान, निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणींना संधी मिळणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. मात्र, भाजपाने तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाही महिलेला मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही.

कोणत्या महिला आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली?

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आमदार आदिती तटकरे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपाकडून आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच भाजपाकडून आमदार मेघना बोर्डीकर यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.