Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. आज नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुक आमदारांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनीही आपली खदखद बोलून दाखवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा