Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे. तीनही पक्षांकडून अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र काही नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना मंत्रिपदासाठीचा फोन आल्याचे सांगितले आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ यांनी वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचे सांगितले. भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आल्याची चर्चा आहे. शिवसेनेला (शिंदे) १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र खरा आकडा शपथविधी सोहळ्यानंतरच कळू शकेल.

रविवारी सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनद्वारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार या शिंदे मंत्रीमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत नाही.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान

हे वाचा >> संभाव्य मंत्र्यांना अखेर निरोप पोहोचले; चव्हाण, मुनगंटीवार यांना विश्रांती, वर्धेचे पंकज भोयर यांना संधी

भाजपाकडून मंत्रिपदासाठी कुणाला फोन?

भाजपाचे नेते गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ आणि जयकुमार रावल यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांना फोन आल्याचे सांगितले आहे. तर इतर नेत्यांपैकी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गणेश नाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले आणि पंकज भोयर यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत आहे.

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे गुलदस्त्यात होती.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: शिंदे गटातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले? आमदार भरत गोगावलेंनी सांगितली नावे

फोन आल्यावर सुन्न झालो

भाजपाचे आमदार जयकुमार रावल म्हणाले की, मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिपदासाठी फोन आला तेव्हा दोन मिनिटे सुन्न झालो. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळणार आहे, याचा आनंद वाटतो. मला मिळालेल्या संधीतून जे जे चांगले काम करता येईल, ते करेन, असे रावल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी जेव्हा मंत्रिपदाच्या यादीवर नजर टाकली, तेव्हा मला खूप आनंद वाटला. सर्व क्षेत्रातील, सर्व भागातील अतिशय जाणकार अशी नावे मंत्रिमंडळाच्या यादीत आहेत. एक चांगली टीम फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. याचा वेगळा अनुभव निश्चितच मिळणार आहे.

Story img Loader