Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे. मात्र तरीही तीनही पक्षांकडून अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून काही आमदारांना शपथविधीसाठी फोन गेले आहेत. किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, महायुतीतील तीन घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील इच्छुक शनिवारी शपथविधीच्या निरोपाची दिवसभर वाट बघत होते. आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी संभाव्य मंत्र्यांची नावे सांगितली आहेत.
वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार भारत गोगावले यांनी आज शिवसेनेचे कोणते आमदार शपथ घेणार याची माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या पक्षात पाच वरिष्ठ नेते आहेत. उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि संजय राठोड आहेत. तसेच नव्या नेत्यांमध्ये मी, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर या नेत्यांना फोन गेलेले आहेत. एकूण १२ लोकांना फोन गेलेले असून ते शपथ घेतील, असे भरत गोगावले म्हणाले.
शपथ घेणारे मंत्री कोण?
1 | शिवसेना | गुलाबराव पाटील |
2 | शिवसेना | संजय राठोड |
3 | शिवसेना | उदय सांमत |
4 | शिवसेना | शंभूराज देसाई |
5 | शिवसेना | प्रताप सरनाईक |
6 | शिवसेना | योगश कदम |
7 | शिवसेना | आशिष जैस्वाल |
8 | शिवसेना | भरत गोगावले |
9 | शिवसेना | प्रकाश आबिटकर |
10 | शिवसेना | संजय शिरसाट |
11 | शिवसेना | दादा भुसे |
स
हे वाचा >> शपथविधी काही तासांवर, संभाव्य मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, नेते संभ्रमात
रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. काहीना फोन गेल्याची माहिती आहे पण त्याला दुजोरा दिला जात नाही. विशेषत: विदर्भात शपथविधी आहे. या भागात भाजपाचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. मात्र नावे जाहीर न झाल्याने ते सर्व अस्वस्थ झाले आहेत.
सर्वाधिक रस्सीखेच शिवसेनेत
मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे इच्छुक जमले होते. प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची इच्छा असल्याने शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यातूनच शिंदे यांनी फिरती म्हणजेच अडीच – अडीच वर्षे मंत्रीपदे वाटून देण्याचा तोडगा काढला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd