List of Ministers in Maharashtra 2024: नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला २३५ जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र ४९ जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी १२ दिवसांनंतर म्हणजेच ५ डिसेंबरला झाला. यानंतर आज (दि. १५ डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत आहे. नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

अनेक चर्चा-बैठकांनंतर झाला देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी!

या १२ दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरेच तर्क-वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? यावरून बराच काथ्याकूट झाला. अखेर ५ डिसेंबरला शपथविधीला अवघे २ तास उरले असताना एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि ५.३० वाजता आझाद मैदानावर तिघांचा शपथविधी पार पडला.

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार?

अखेर या सर्व चर्चांच्या फेऱ्यांनंतर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. त्यानुसार हा मंत्रीमंडळ विस्तार येत्या १४ डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे आता कुणाला कोणतं खातं मिळणार? या चर्चांवर पडदा पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.

विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी

क्रमांकपक्षमंत्र्यांचं नावजबाबदारी/खातं
भाजपादेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
शिवसेनाएकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीअजित पवारउपमुख्यमंत्री
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१०निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
११निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१२निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१३निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१४निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१५निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१६निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१७निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१८निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
१९निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२०निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२१निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२२निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२३निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२४निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२५निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२६निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२७निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२८निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
२९निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३०निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३१निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३२निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३३निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३४निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३५निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३६निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३७निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३८निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
३९निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
४०निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
४१निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
४२निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित
४३निर्णय प्रलंबितनिर्णय प्रलंबित

महाराष्ट्रात एकूण ४३ मंत्र्यांचं मंत्रीमंडळ अस्तित्वात येऊ शकतं. त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे कोणत्या अतिरिक्त खात्यांचा पदभार सोपवला जाणार, याविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती.

Story img Loader