Maharashtra Cabinet swearing-in : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरही एकनाथ शिंदेंची सरकारमध्ये काय भूमिका असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु, त्यानंतर काहीच अधिकृत माहिती समर आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. परंतु, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रीपदामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे या पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती. गेल्या आठवड्यात दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट सातारा येथील त्यांच्या दरे या गावी गेले. तिथे गेल्यावर त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील बैठका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मुख्यंत्रीपदाचा सन्सेन्स कायम होता. गावाहून मुंबईला पोहोचल्यानंतरही त्यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने राज्यात अधांतरित वातावरण होतं. अखेर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तास्थापनेसाठी माझी कोणतीच अडसर नसेल अशी भूमिका घेतल्याने ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे आल्याचं म्हटलं गेलं.

हेही वाचा >> Devendra Fadnavis New CM: शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी आता मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांच्या शिक्षिकेने सांगितल्या शाळेतील गंमती जमती!

एकनाथ शिंदेंबाबत सन्स्पेन्स कायम

दरम्यान, ५ डिसेंबर रोजी ५ वाजता राज्यात शपथविधी सहळा होणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, आणखी दोन उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी होईल. परंतु, उपमुख्यमंत्रीपदाच्या रुपाने कोण शपथ घेईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत काल (४ डिसेंबर) सायंकाळपर्यंत खुलासा करू असं देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. परंतु, काल रात्री उशिरापर्यंत हा खुलासा आला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची भूमिकाही आता सन्सेन्स ठरली आहे. इतर वृत्तांनुसार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी झाले असून त्यांनी इतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलेली आहे. परंतु, आज इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी कोणती खाती मागितली आणि कोणत्या खात्यांची मागणी मान्य झाली, हे आगामी काळात कळेल.

मंत्रिमंडळ रखडणार?

मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ११ किंवा १२ डिसेंबरला करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे. मात्र महायुतीतील पेच सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत फडणवीस आणि शिंदे यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु होत्या आणि फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. केवळ तिघांचा शपथविधी न करता आणखी प्रत्येकी दोन किंवा तीन म्हणजे एकूण नऊ किंवा बारा मंत्र्यांचा शपथविधी करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती. याबाबतचा निर्णय अद्यापही समोर आलेला नाही.

o

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet swearing in devendra fadnavis to take oath as maharashtra cm eknath shinde stands still suspence sgk