कासा : विक्रमगड तालुक्यातील साखरा येथील शासकीय आश्रमशाळेतील बारावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी या वेळी, आश्रमशाळा प्रशासनाला जबाबदार ठरवले, माझ्या मुलीवर लक्ष का ठेवले नाही, असा सवाल भुसारा यांच्याकडे केला.
मुलीच्या वडिलांचे म्हणणे लक्षात घेत, आमदार सुनील भुसारा यांनी तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपस्थित शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना या कुटुंबापर्यंत तात्काळ शासकीय मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. या वेळी सभापती रुचिता कोरडा, राष्ट्रवादीचे विक्रमगड विधानसभा अध्यक्ष कमळाकर धुम, कार्याध्यक्ष रमण कोरडा, रमेश दोडे, युवक अध्यक्ष भरत भोये, पंचायत समिती सदस्य शंकर माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.