मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. काही लोक घरात बसून राज्याचा राज्यकारभार हाकायचे. मात्र आम्ही त्यांना एक करंट दिला आणि ते ऑनलाईनवरून लाईनवर आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच तुम्ही सकाळी कितीही भोंगे लावा (टीका) आम्ही आमचे काम करत राहणार. आम्ही आमच्या कामातून उत्तर देणार, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज परभणी येथे राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्व योजनांना केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा मिळणार- शिंदे

यावेळी बोलताना “इतर देशातील प्रमुख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतात. हा तमाम देशवासीयांचा गौरव आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना करू द्या. आपण काम करुया. आपण या राज्याचा विकास करुया. या राज्याला पुढे नेऊया. त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारचे पाठबळ मिळत आहे. आपल्या योजनांना केंद्र सरकारकडून संमती मिळत आहे. समुद्रात वाया जाणारे पाणी वळवून आपल्याला मोठे प्रकल्प करायचे आहेत. या सर्व प्रकल्पांना केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा मिळणार आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर

आम्ही त्यांना लाईनवर आणले- एकनाथ शिंदे.

“देश आता चंद्रावर जात आहे. मात्र दुसरीकडे काही लोक घरातच बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते. परंतु आम्ही करंट दिला. त्यांना एक झटका दिला. आम्ही त्यांना ऑनलाईनवरून थेट लाईनवर आणण्याचे काम केले आहे,” अशी खोचक टीका केली.

चांगली सूचना करण्यासाठी त्यांचा भोंगा कधीच वाजला नाही- शिंदे

“आम्ही कामाला महत्त्व देतो. तुम्ही सकाळी, दुपारी भोंगे लावा. मात्र त्यांचे भोंगे शिव्या देण्यासाठी, आरोप करण्यासाठी आहेत. एखादी चांगली सूचना करण्यासाठी त्यांचा भोंगा कधीच वाजला नाही. परंतु या शासनाचा भोंगा ‘शासन आपल्या दारी’ अशा प्रकल्पांच्या माध्यमातून वाजत आहे. हे शासन सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या कामाची स्तुती केली.

Story img Loader