शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

शिंदे गटाला मनसे रसद?; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसंच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असेही त्यावेळी ठरलं.

एकनाथ शिंदे – राज ठाकरे भेट

१ सप्टेंबरला गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ‘‘ही भेट गणेश दर्शनासाठी होती. पण, राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याच वेळी अंतिम होईल’’, असं शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे-ठाकरे भेटीनंतर सांगितलं होतं.

राज ठाकरे उपस्थित राहणार?

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? असं विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले “जेव्हा हे सरकार स्थापन होत होतं, तेव्हाही अनेक चर्चा होत होत्या. काही बातम्या आल्या की अनेक लोकांच्या पोटात गोळा यायचा. हीदेखील चर्चा आहे. अजून गणपती विसर्जन झालेलं नाही, त्यानंतर पितृ पंधरवडा, नवरात्री आणि नंतर दसरा आहे. सगळं आताच कसं काय सांगणार? त्याला फार अवधी आहे. मधल्या काळात अनेक गोष्टी होत असतात”.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी नाही

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदाही मेळाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. परंतु, मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महापालिकेकडून परवानगीसाठी चालढकल करण्यात येत असल्याने ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात विघ्न येणार, हे स्पष्ट झालं. त्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.

नारायण राणे राहणार उपस्थित?

शिवसेनेला आव्हान देऊन दसरा मेळावा घ्यायचा, तर त्यासाठी मुंबईत एकटय़ा शिंदे गटाची ताकद पुरणार नाही. यामुळे दसरा मेळाव्यासाठी समविचारी नेते, पक्षांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत घेण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने चाचपणी सुरू केली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होईल, असं विधान केलं आहे. शिंदे यांनी बोलावले तर मी मेळाव्याला जाईन, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader