राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनियमितता आढळली होती. या सगळ्याची चौकशी आता ईडीतर्फे केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Santosh Deshmukh murder case, Santosh Deshmukh murder,
संतोष देशमुख हत्या प्रकरण; नवीन एसआयटी
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले

महाराष्ट्र राज्य सहाकरी बँकेने मनमानीने कर्ज वाटप केलं होतं. त्यामुळे या बँकेला १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. हा घोटाळा २५ हजार कोटींवर गेला. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांपूर्वीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकापचे जयंत पाटील यांचंही नाव यामध्ये समोर आलं आहे. मात्र आमची यामध्ये काहीही चूक नाही असं शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बँकेशी संबंधित सर्व संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते

 

कसे झाले राज्य सहकारी बँकेचं नुकसान?

  • संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
  • नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा
  • गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६०कोटींचे कर्ज
  • केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा
  • २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५कोटींची थकबाकी
  • २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
  • लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान
  • कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८कोटींची थकबाकी
  • खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान
  • ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा

कोणत्या नेत्यांची नावं?

मधुकर चव्हाण

अजित पवार

रजनीताई पाटील

जयंतराव आवळे

राजवर्धन कदमबांड

प्रसाद तनपुरे

 

Story img Loader