Vijay Wadettiwar on Nana Patole: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता जवळपास तीन आठवडे उलटले आहेत. एकीकडे सत्ताधारी गोटात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला असला, तरी अद्याप खातेवाटपाचा तिढा चालूच असल्याचं दिसत असताना दुसरीकडे विरोधकांमध्येही निकालाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्यापासून पक्षांतर्गत हालचालींपर्यंत अनेक स्तरांवर हे परिणाम दिसण्याची चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी श्रेष्ठींकडे पदमुक्त करण्याची केलेली विनंती याचाच एक भाग असल्याचं मानलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेत १३ खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या १०५ जागांपैकी फक्त १६ जागा निवडून आणता आल्या. त्यामुळे विरोधकांप्रमाणेच काँग्रेसच्याही महाराष्ट्रातील पक्षसंरचनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्यातच आता नाना पटोलेंनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना केलेल्या विनंतीमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच नेतृत्वबदल?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शुक्रवारी मल्लिकार्जुन खर्गे यांना इमेल करून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी ही विनंती केली आहे. गेल्या चार वर्षांपासून आपण या पदावर असून ही जबाबदारी सांभाळत आहोत. आता आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी विनंती पटोलेंनी केली असून या वृत्ताला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दुजोरा दिला आहे.

विजय वडेट्टीवार यांची सूचक प्रतिक्रिया!

दरम्यान, काँग्रेस आमदार व माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घडामोडींवर सूचक विधान केलं आहे. पटोलेंनी विनंती केल्याबाबत आपल्याला माहिती नाही, पण राज्यातल्या प्रमुखांवर विजय किंवा पराभवाच्या जबाबदाऱ्या असतातच, असं ते म्हणाले आहेत.

Nana Patole: चार वर्ष झाले पदमुक्त करा- नाना पटोले यांचे खरगे यांना पत्र

“जे राज्यातले प्रमुख नेते असतात, त्यांची जबाबदारी असते. ते पराभवासाठीही जबाबदार असतात आणि विजयासाठीही जबाबदार असतात. लोकसभेवेळीही हे झालं. प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे साहजिकच त्यांना श्रेय मिळतं. त्यामुळेच पराभवाचंही श्रेय त्यांनाच जातं. त्यामुळे कदाचित नाना पटोलेंनी राजीनामा सादर केला असेल. त्याबाबत केंद्रातील आमचे हायकमांड निर्णय घेतील. त्यांना काढायचंय की ठेवायचंय हा निर्णय हायकमांडचा आहे. पण त्यांनी राजीनामा दिल्याबाबत मला माहिती नाही. मी हे माध्यमांमध्ये ऐकलं आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभेत काँग्रेसचा मोठा पराभव!

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. स्वत: नाना पटोलेही फक्त २०४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळेच पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोलेंच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सध्या चालू आहे.