अलिबाग दरोडा प्रकरणातील ९ आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी चार पोलीस कर्मचाऱ्यांसह सात आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. तर मुनीरा आणि साहिल दापोलकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

मुंबईतील घाटकोपर येथील व्यापारी विमल पटेल यांना मुनीरा दापोलकर हिने कमी भावात जमीन देते असे सांगून अलिबागला बोलावून घेतले होते. मात्र त्यानंतर त्याचे अपहरण करून त्यांच्याकडील पन्नास लाखांपकी ४० लाख रुपयांची रोख रक्कम इतर आठ जणांच्या मदतीने लुटून घेतली होती. २६ डिसेंबर २०१६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवला होता. यात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्य़ासाठी वापरलेल्या गाडय़ा, लुटण्यात आलेल्या एकुण रकमेपकी २ लाखांची रक्कम आणि सर्व आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. उर्वरीत रकमेचे या सर्वानी काय केल़े़ याचा तपास सध्या सुरु आहे.

Story img Loader