माजी सरपंचाविरोधात खेड पोलिसांकडे तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूर्ववैमनस्यातून सतरा गुंठय़ावरील आंबा, नारळाची बागच जाळून टाकल्याची घटना खेड तालुक्यातील मुरडे येथे घडली आहे. विशेष म्हणजे जागामालक मुंबईला स्थायिक असल्याचा फायदा घेऊन संबंधिताने या जाळपोळीचे पुरावेही माती टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याप्रकरणी पोलिस चौकशी सुरू असून चौकशीअंती संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची आश्वासन खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण यांनी दिली.

या याप्रकरणी जागामालक व्यंकटेश दळवी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मुरडे येथे व्यंकटेश दळवी यांचे घर आणि जमीन आहे. त्यांनी घराशेजारील मोकळ्या १७ गुंठे जमिनीवर आंबा, नारळ, सुपारीची लागवड केली होती. या बागेला मे २०१६ मध्ये चिऱ्यांची संरक्षक िभत घालण्यासाठी त्यांनी सुरूवात केली असता या जागेतून रस्ता जातो, असा दावा करण्यात आला. याप्रकरणाची सुनावणी तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यासाठी शेजारी राहणारे गावडे कुटुंबीय आणि दळवी यांनी सर्वप्रथम शासकीय मोजणी करून घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिला.

त्यानुसार व्यंकटेशी दळवी यांनी ३ ऑगस्टला जमिनीची मोजणी केली. त्यात गावडे यांच्या जमिनीकडे जाण्यासाठी दळवी यांच्या जमिनीतून कोणताही अंतर्गत रस्ता नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही तंटामुक्त समितीने दळवी यांना संरक्षक िभत बांधण्यास मज्जाव करून खेड पोलिस ठाण्याच्या पोलिसांसमक्ष गावडे यांना १५ जानेवारीपूर्वी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यास सांगण्यात आली. पण गावडे यांनी ९ जानेवारीला शासकीय मोजणीचे पत्र आलेले असताना मोजणीसाठी आणखी मुदत वाढवून मागितली. दरम्यानच्या काळात या जमिनीचे कुलमुखत्यारपत्र माजी सरपंच दिगंबर दळवी यांना दिले. दिगंबर दळवी यांचे वडिलोपार्जति मालमत्तेवरून व्यंकटेश दळवी यांच्याबरोबर न्यायालयीन वाद सुरू आहेत. गावडे यांनी ठरल्याप्रमाणे विहित मुदतीत शासकीय मोजणी न केल्याने व्यंकटेश दळवी यांनी रस्त्याकडील संरक्षक िभतीचे काम पूर्ण केले. ते करताना लगतची गावडे यांच्या जमिनीकडे जाणाऱ्या पायवाटेची जागाही सोडली. पण दिगंबर दळवी यांनी साथीदारांसह दहशत निर्माण करत २५ फेब्रुवारीला या जमिनीतील आंबा, नारळ, सुपारीच्या झाडांसह झुडूपांनाही आग लावली. तेथे काम करणाऱ्या दांपत्यालाही ‘यामध्ये पडू नका,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर जागामालक व्यंकटेश दळवी हे व्यस्त कामामुळे गावी येऊ शकले नाहीत. याचा फायदा घेत २७ फेब्रुवारीला दिगंबर दळवी यांनी पुन्हा साथीदारांना घेऊन व्यंकटेश दळवी यांच्या जमिनीत माती टाकून रस्ता तयार केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राजकीय वजन वापरून जनसामान्यांमध्ये अशी दहशत निर्माण करण्याचे प्रकार कोकणातील गावांत सर्रास आढळतात. वाळीत प्रकरणांप्रमाणेच याबाबतही पोलिस यंत्रणेने अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, अशी चर्चा परिसरात व्यक्त होत आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण अधिक तपास करत आहेत.