Daily Petrol Diesel Price In Marathi : आज १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित पेट्रोल व डिझेलचे दर निश्चित केले जातात. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर कधी फटका तर कधी नागरिकांना दिलासा सुद्धा मिळतो. तर आज पेट्रोल व डिझेलचा भाव (Daily Petrol Diesel Price) वाढला आहे की कमी झाला आहे हे आपण खाली दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Daily Petrol Diesel Price )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.९४९०.५९
अकोला१०४.७१९०.७८
अमरावती१०४.८० ९१.३४
औरंगाबाद१०५.४२९२.०३
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०४.४९९१.०१
बुलढाणा१०५.२४९०.९७
चंद्रपूर१०४.९२९०.६८
धुळे१०४.०४९१.१५
गडचिरोली१०५.००९१.५४
गोंदिया१०५.३९९२.०९
हिंगोली१०५.५०९१.६९
जळगाव१०५.४१९१.७०
जालना१०५.१४९२.६४
कोल्हापूर१०४.७३९१.२७
लातूर१०५.५०९१.९२
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.२०९०.६१
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.३३
नाशिक१०४.६३९०.९२
उस्मानाबाद१०५.३४९१.४३
पालघर१०४.९२९०.७३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८९९०.७१
रायगड१०३.९६९०.४६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९१.०३
सातारा१०४.८९९०.८८
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५७९१.६१
ठाणे१०४.३७९०.८६
वर्धा१०४.१७९१.३४
वाशिम१०४.८९९१.५८
यवतमाळ१०५.२८९१.०३

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जाहीर करतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाचे दर किंचित वाढल्याचे दिसून आले आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Daily Petrol Diesel Price) :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

१० सीटर कार खरेदी करायची आहे का ?

फॅमिली पिकनिक किंवा मित्रांबरोबर एखाद्या सहलीला जायचे असल्यास पाच सीटरच्या गाडीचा काहीच उपयोग नसतो. मग अनेकांना छोट्या गाडीत एका सीटवर तीनऐवजी चार लोकांना बसवून घेऊन जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास अडचणींचा होऊन जातो. त्यामुळे जर तुम्हाला नऊ ते १० सीटर कार घ्यावी लागेल. इंडियन ऑटो मेकर ब्रँड फोर्स मोटर्स भारतात सिटीलाईन नावाने एक १० सीटर कार विकते.

१. फोर्स सिटीलाइन 3050WB ची एक्स-शोरूम किंमत १६,२८,५२७ रुपये आहे.

२. फोर्स सिटीलाइन या गाडीचे २.६ लिटर डिझेल इंजिन मर्सिडीज-बेंझवरून प्राप्त करण्यात आले आहे. पण, ते ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह फक्त 91hp व 250Nm टॉर्क जनरेट करते.

३. फोर्स सिटीलाइन 9+D आसन क्षमता असलेली ही गाडी ड्रायव्हरसह १० सीटरची आहे. तसेच गाडीमध्ये दुसऱ्या व चौथ्या रांगेत बेंच सीट्स मिळतात आणि तिसऱ्या रांगेत कॅप्टनच्या सीट्स आहेत.

Story img Loader