महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्त्वे जन्माला आलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळेच या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आलेले आहेत. मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? –

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास –

जेव्हा इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाची प्रादेशिक घटना खूप वेगळी होती. शेकडो राज्ये एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली. १९५६ मध्ये, राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या. आज बरीच नवीन राज्ये आपल्या परिचयाची आहेत, पण त्यांत मराठी, गुजराती, कच्छी आणि कोंकणी अशा भाषिक गटांचा समावेश असलेल्या मुंबई राज्यासारख्या विसंगती निर्माण झाल्या. या मतभेदांमुळे बॉम्बे स्टेटला दोन राज्यांत विभागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली, एक म्हणजे जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरे जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोंकणी बोलतात.

हेही वाचा – Maharashtra Day: महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज

महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? –

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्या वेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याच वेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्याच वेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनांचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये २५ एप्रिल १९६० रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार अस्तित्वात आली. हा कायदा १ मे १९६० रोजी अमलात आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra day 2023 why 1 may is celebrated as maharashtra day know history and significance in marathi srk