महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंनी सोडली जात नाहीये. मात्र, त्यादरम्यानच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी संध्याकाळी केलेली एक भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. जळगाव दौऱ्यावर असताना एका ठिकाणी घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटबरोबर शेअर केला आहे. या व्हिडीओप्रमाणेच त्यातली युवती देवेंद्र फडणवीसांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावतानाचा फोटोही तितकाच व्हायरल होत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचं एका युवतीनं औक्षण केल्याचा हा व्हिडीओ आहे. मात्र, व्हिडीओमधील युवती दिव्यांग असून पायांनी औक्षणाचं ताट धरून तिनं फडणवीसांना ओवाळलं. एवढंच नाही, तर तिनं तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं देवेंद्र फडणवीसांना टिळा लावला. या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करताना देवेंद्र फडणवीसांनी भावनिक पोस्ट केली आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

या व्हिडीओसोबत फडणवीसांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. या प्रसंगी आपलं मन अंतर्बाह्य थरारून गेल्याचं फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला, पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याच पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की ‘तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे”, असं फडणवीसांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“ते सगळं पाहून मी इतकंच म्हणालो, ‘ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत’. या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला”, असं आपल्या पोस्टच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader